युनिक फीचर्सविषयी

 • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल.
 • १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र येऊन कोणत्याही एका दैनिकाच्या दैनंदिन कामकाजात अडकून राहण्याऐवजी अनेक दैनिकांबरोबर काम करण्याच्या हेतूने स्थापन केलेली संस्था
 • सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केली जाणारी पत्रकारिता. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारं चौफेर लेखन.
 • राज्य, तसेच जिल्हा स्तरावरची प्रमुख मराठी वर्तमानपत्रं, महत्त्वाची मासिकं, साप्ताहिकं, दिवाळी अंकांना संपादकीय मजकूर पुरवणारी मराठीतील पहिली यशस्वी फीचर सर्व्हिस.
 • छापील माध्यमाबरोबर टीव्हीवरही ठसठशीत कामगिरी.
 • शासकीय, बिगर शासकीय संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, शिक्षणसंस्था यांच्यासाठीही पत्रकारितेच्या माध्यमातून काम करणारी देशातील एकमेव संस्था.
 • समकालीन विषयांवर आधारित सकारात्मक आणि अर्थपूर्ण पुस्तकांची निर्मिती.
 • प्रेरणादायी आणि वाचकांना विचार करायला लावणार्‍या पुस्तकांना बेस्टसेलर बनवण्याचा ट्रेंड मराठीत.
 • आम्ही कोण?

  पत्रकारितेबद्दल स्वतःची निश्चित भूमिका असलेल्या तरुण मित्रांच्या प्रयत्नांतून युनिक फीचर्स या माध्यमसंस्थेची स्थापना झाली. एकाहून अधिक लोकांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तिस्थानांचा वापर केला तर निर्माण होणा-या सामूहिक ऊर्जेतून अधिक परिणामकारक काम होऊ शकतं, या भूमिकेतून तरुण पत्रकारांचा मोठा संच या माध्यमसंस्थेने उभा केला. त्यातून मराठीतीलच नव्हे तर भारतातील एकमेवाद्वितीय माध्यमसंस्था उभी राहिली.

  सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, संतोष कोल्हे, प्रसाद मिरासदार, राजेश्वरी देशपांडे, राजेंद्र साठे या मित्रांनी या संस्थेची उभारणी केली. आज २० वर्षांचा टप्पा पूर्ण करत असताना या संस्थेने अनेक नवे पायंडे पाडले आहेत. वृत्तपत्रांना वृत्तलेखसेवा देण्याच्या प्राथमिक उद्देशापासून सुरू झालेल्या या संस्थेच्या छत्राखाली आज अनेक कल्पक आणि यशस्वी उपक्रम राबवले जातात.

  सध्या सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी हे पत्रकार, तरुण आणि उत्साही सहका-यांच्या सोबतीने ते नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणू पहात आहेत. सुहास कुलकर्णी यांना राज्यशास्त्राच्या अभ्यासाची पार्श्वभूमी असून ते संस्थेचे संपादक-संचालक म्हणून कार्यरत आहेत. आनंद अवधानी यांनी पत्रकारितेचे रीतसर शिक्षण घेतले असून ते संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी पार पाडतात.

  आनंद अवधानी              सुहास कुलकर्णी
  आनंद अवधानी सुहास कुलकर्णी

  घुसळण कट्टा