समकालीन प्रकाशन

नव्या जगाचा, नव्या समाजाचा, नव्या प्रश्नांचा थांग शोधणं, ते समजून घेणं आणि मराठीतील वाचकांशी पुस्तकरूपानं संवाद साधणं, हा समकालीन प्रकाशन सुरू करण्यामागचा विचार आहे.त्यामुळेच प्रकाशनाच्या नावात समकालीन हा शब्द आहे. ऑगस्ट २००६ मध्ये खरेखुरे आयडॉल्स हे समकालीनचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे-लढणारे, सर्वसामान्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी संशोधन करणारे, प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते, संशोधक, अधिकारी अशा अनेक कार्यरत व्यक्तींची ओळख करून देणारं हे पुस्तक. एकीकडे या व्यक्तींच्या कामाला सलाम करणारं आणि त्याचवेळी आदर्शच ठेवायचा तर तो अशा कामांचा ठेवा, असं आवाहन तरुणांना करणारं. गेल्या चार वर्षांमध्ये या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या निघाल्या, त्यावरून वाचकांचा प्रतिसाद लक्षात यावा.

खरे़खुरे आयडॉल्स ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनिल अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्टपर्यंतच्या सर्व पुस्तकांना वाचकांनी - आम्हाला हेच हवं होतं-, असं म्हणत उदंड प्रतिसाद दिला आहे. चरित्र, आत्मचरित्र, राजकीय- सामाजिक आणि शोधक ललित अशा विविध फॉर्म्समधून समकालीन प्रकाशनाची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. विषयांची निवड, दर्जेदार लेखकांचा शोध, वाचकांप्रति बांधिलकी, निर्दोष अंतरंगासाठी कष्ट अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अल्पकाळातच समकालीन प्रकाशन हे मराठीचील अव्वल प्रकाशकांच्या रांगेत विराजमान झालं आहे.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा