समकालीनची आगामी पुस्तकं

१) प्रख्यात विज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी लिहिलेलं स्वतःचं वाचनचरित्र - लेखकांनी आत्मचरित्र लिहिणं हे आपल्यासाठी नवं नाही. पण निरंजन घाटे यांनी लिहिलंय ते त्यांनी आजवर वाचलेल्या असंख्य पुस्तकांबद्दल, त्यांच्या लेखकांबद्दल आणि ही पुस्तकं मिळवण्याच्या खटाटोपाबद्दल. मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग.

२) महाराष्ट्र दर्शन - महाराष्ट्राच्या अभिमानाची गाणी गाण्यात आपण पुढे असलो तरी मराठी माणसांना महाराष्ट्राची बेसिक माहिती नाही, असं दिसतं. म्हणजे सांगलीच्या माणसाला गोंदिया कुठे आहे असं विचारलं किंवा धुळ्याच्या माणसाला मिरज कुठे आहे विचारलं तर नकाशावर योग्य ठिकाणी हात जाईलच असं नाही. मग राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याची सामाजिक-सांस्कृतिक जीवनाची माहिती असणं तर अशक्यच. म्हणूनच युनिक फीचर्सने राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधील लोकजीवनाचा मागोवा घ्यायचं ठरवलं आणि त्यातूनच आकाराला येतोय महाराष्ट्र दर्शन हा ग्रंथ.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा