शोध नेहरूंचा आणि भारताचाही

पुस्तकासंबंधी माहिती
शोध नेहरूंचा आणि भारताचाही
लेखक: 
शशी थरूर
संपादक: 
अनुवाद - मनोहर सोनवणे
पृष्ठसंख्या: 
१९९
पहिली आवृत्ती: 
१५ ऑगस्ट २०१५
मुखपृष्ठ: 
संदीप साळुंके
संक्षिप्त परिचय: 
जवाहरलाल नेहरूंच्या योगदानाची आणि मर्यादांची तटस्थ चर्चा.

जवाहरलाल नेहरू... देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं. आयुष्याची तीस वर्षं ते इंग्रजांशी झगडत राहिले. त्यातील जवळपास नऊ वर्षं त्यांनी कारावास भोगला.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. सलग सतरा वर्षं. देशाच्या विकासाची दृष्टी त्यांनी विकसित केली. जनतेत आत्मविश्वास आणि परदेशांत ओळख निर्माण केली.
नेहरूंची कारकीर्द संपून आता अर्धशतक लोटलं आहे. त्यांच्या विचारांचा देशावर अजूनही प्रभाव असला, तरी वारसा फारच थोडा शिल्लक आहे. शिवाय अनेक बाबतींत ते टीकेचे धनीही बनत आहेत.
एका लढवय्या आणि कर्तबगार लोकनेत्याच्या आयुष्याची कहाणी ही अशी आहे. शशी थरूर यांनी लिहिलेलं हे चरित्र या कहाणीचे ताणेबाणे उकलून दाखवतं, नेहरूंच्या योगदानाची तटस्थ चर्चा करतं आणि नेहरूंविषयीच्या समज-गैरसमजाचं निरसन करतं. नेहरूंकडे पन्नास वर्षांनंतर कसं पाहायचं हे सांगतं.
आजच्या पिढीसाठी 'मस्ट रीड' पुस्तक.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

पुस्तक परीक्षणे

लवकरच येत आहोत नव्या मजकुरासह.

समकालीन प्रकाशनची पुस्तके

घुसळण कट्टा