आनंदवन प्रयोगवन

पुस्तकासंबंधी माहिती
आनंदवन प्रयोगवन - डॉ. विकास आमटे
लेखक: 
डॉ. विकास आमटे
संपादक: 
शब्दांकन – गौरी कानेटकर
पृष्ठसंख्या: 
१९२
पहिली आवृत्ती: 
२६ डिसेंबर २०१४
मुखपृष्ठ: 
श्याम देशपांडे
संक्षिप्त परिचय: 
अपार कष्ट आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर बाबा आमटे यांचं मानवमुक्तीचं स्वप्न साकारणाऱ्या ध्येयवेड्यांची गोष्ट.

बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे.

शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.

आज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याहीपलीकडे गावाखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरणही आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाऱ्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे.

आनंदवन प्रयोगवन महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक दुकानांमध्ये उपलब्ध. ज्या ठिकाणी एकही पुस्तक दुकान नसेल अशा ठिकाणचे वाचक bookganga या वेब-साईटवरुन अॉनलाईन पुस्तक मागवू शकतात किंवा ९९२२४३३६०६ या नंबरवर दिलीप पानसरे यांच्याशी संपर्क साधावा.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

पुस्तक परीक्षणे

लवकरच येत आहोत नव्या मजकुरासह.

समकालीन प्रकाशनची पुस्तके

घुसळण कट्टा