अनुभवपर लेख

पब्लिकहितार्थ

लोकांच्या शिक्षणासाठी विविध पातळ्यांवर संवादाचे शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर जे उपक्रम राबवले जातात त्यातल्या गंमतीजंमती सांगता सांगता आतून जे वाटतं ते सांगणारा हा लेख.

-अतुल पेठे
अंकः दिवाळी २००४

‘विपश्यना’ : एक आर्त अनुभूती

‘फस्स पच्चया वेदना...’ म्हणजे सुख संवेदनांचा शरीर - मनाला होणारा स्पर्श. मानवी दु:खाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न पूर्वीपासून केला जात आहे. गौतम बुद्धाने या दु:खाची संगती मानवी पंचेंद्रियांना बाह्यजगतातील वस्तूमात्रांच्या संपर्कातून मिळणा-या संवेदनांशी जोडली. यातून मुक्तीचा ‘विपश्यना’ हा ध्यानमार्ग सांगितला. प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांना या ध्यान मार्गाची जी अनुभूती मिळाली ती त्यांच्याच शब्दात...

-डॉ. राजेंद्र बर्वे
अंकः दिवाळी २००४

’मुक्काम’ सरकारी हॉस्पिटल

कोणतंही सरकारी हॉस्पिटल हे एक विलक्षण जग असतं. तिथे उपचार घेणारी हीन-दीन माणसं; त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय; त्यांचं त-हेत-हेचे स्वभाव, वृत्ती-प्रवृत्ती, आचार-विचार यांचं मिळून तयार झालेलं हे जग असतं. या जगाचं अनुभव दर्शन!

-दिलीप भंडारे
अंक: दिवाळी २००६

संगणक खेळाचं व्यसनजाल

बरेचदा व्यसनमुक्तांचे अनुभव ऐकायला, वाचायला मिळतात. बरेचदा आपल्यासारख्याच इतरांना त्यातून व्यसनमुक्तीचा मार्ग सापडेल असा सद्हेतू असतो. मी माझ्या व्यसनाचा अनुभव सांगतोय. तो वाचून कुणाला आधार मिळाला तर छानच; पण तो माझा मूळ हेतू नाही. माझ्या अनुभवाकडे तटस्थ बघण्याचा माझा एक प्रयोग आहे. माझं व्यसन संगणक-खेळाचं आहे. त्याचे वैयक्तिक तोटे पुष्कळ झाले तरी सामाजिक जाण फारशी कोणाला नसेल. त्याचा इतरांना फारसा तोटा झाला नसेल. मला असं काही व्यसन जडलं आहे, अशी माझ्या जवळच्या लोकांनापण फारशी जाणीव नसेल. शिवाय व्यसनांबद्दलच्या कुतुहलापोटी मी लावून घेतलेल्या व्यसनाचा माझा हा प्रयोग होता, त्यामुळे मला व्यसन जडल्याचा अपराधगंड नाही किंवा त्यातून सध्या बाहेर असल्याची प्रौढीपण मला मिरवायची नाही. त्यामुळे झाली तर थोडी करमणूक, थोडा वेगळा अनुभव, थोडी उद्याच्या समाजावर येऊ घातलेल्या संकटाची जाणीव आणि थोडी मनोव्यापाराची गंमत वाटली तरी बास झालं.

-जयंत गाडगीळ
अंकः दिवाळी २००६

मला (आणि वाचकांनाही) जागं केलेलं पुस्तक - अनिल अवचट

लेखक, मग तो कमी लिहिणारा असो किंवा भरपूर; त्याची काहीच पुस्तकं लोकप्रिय होतात, सर्वमान्य ठरतात, महत्त्वाची मानली जातात.
अशा पुस्तकांबद्दल वाचकांना नेहमीच कुतूहल वाटत असतं, जिज्ञासा वाटत असते. हे पुस्तक कसं सुचलं, कोणत्या काळात-कोणत्या पार्श्‍वभूमीवर लिहावंसं वाटलं, त्या पुस्तकाचं स्वागत कसं झालं, उलटसुलट चर्चा झाल्या का, त्या पुस्तकाचा वाचकांवर व एकूण समाजावर किंवा सामाजिक विचार-व्यवहारांवर काही परिणाम झाला का, या पुस्तकाने मराठी लेखनशैलीत काही भर घातली का, वळण दिलं का, वगैरे अनेक प्रश्न वाचकाच्या मनात तरळत असतात.
अशाच काही प्रश्नांवर आम्ही मराठीतील नामवंत आणि प्रतिभावंत लेखकांना लिहिण्याचं आमंत्रण दिलं आहे. आपल्याला स्वत:चं जे पुस्तक महत्त्वाचं वाटतं त्या पुस्तकावर लेखकाने लिहावं, असं आवाहन आम्ही त्यांना केलं आहे. या लेखमालिकेची सुरुवात मराठी रिपोर्ताज शैली रुजवलेले अनिल अवचट करत आहेत, गाजलेल्या आपल्या ‘माणसं’ या पुस्तकाबद्दल लिहून.
- संपादक

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा