माणसं

जागल्या

जागतिकीकरणाचे झापड डोळ्यावर ओढून घेतलेल्या पत्रकारितेत पी. साईनाथ यांची पत्रकारिता पेटल्या मशालीसारखी आहे. दुष्काळ,भूक, गरिबी हे त्यांच्या लिखाणाचे विषय आहेत. ते या प्रश्नांच्या मुळाशी जातात. या प्रश्नांच्या मागचं वास्तव उपरोधिक शैलीने मांडतात. इथल्या व्यवस्थेवर, शासनावर, माध्यमांवर झोंबè`m भाषेत टीका करतात. तेवढं नैतिक बळ त्यांच्याकडे आहे, कारण त्यासाठी त्यांनी हजारो मैलांची पायपीट केलेली असते. समाजातल्या तळातल्या माणसाला त्यांनी गाठलेलं असतं. त्यांचं लिखाण वाचताना मेंदूला झिणझिण्या येतात. आंतरराष्ट्रीय मानसन्मानातून मिळालेली पारितोषिकाची रक्कम ते गरिबीच्या नव्या पैलूचा वेध घेण्यासाठी वापरतात. शब्दांच्या माध्यमातून पी. साईनाथ ‘जागल्या’ची भूमिका कशी पार पाडतात याचा प्रत्यय या लेखासोबतच्या त्यांच्या ‘अ बस टू मुंबई’ या दै. हिंदू मधून प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ताजच्या अनुवादातून येईल.

-आनंद अवधानी

संस्कृतीचा बंडखोर शोधक

- मिलिंद बोकिल.

विश्वनाथ खैरे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत. समाज-संस्कृती-भाषा-साहित्य यांच्या जडणघडणीच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न वेगळ्या वाटेने जाणारा आहे. त्यांनी आजवर केलेल्या मांडणीतून पारंपरिक तर्काला, विचाराला आणि समजांना जोरदार धक्का दिला आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाला कलाटणी देण्याचं सामर्थ्य त्यांच्या मांडणीत आहे. ज्या कोणाला आपल्या भाषेची, समाजाची जडणघडण समजून घ्यायची असेल त्यांच्यासाठी विश्वनाथ खैरे यांचं लेखन वाचणं ‘द मस्ट’ आहे.

त्यांच्याविषयी, त्यांच्या योगदानाविषयी.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा