रिपोर्ताज

छप्पर बंद म्हणतात लई न्हाई ’मागणं

छपरबंद नावाचा एक समाज आहे.
दरिद्री, अशिक्षित, मागासलेला.
धड हिंदूही नाही, धड मुसलमानही नाही.
कुठून कुठून विस्थापित, बिनघराचा-बिनछपराचा.
नावात फक्त छप्पर.
कारण मोगलांना नि पेशव्यांना
यांनी छप्परं बांधून दिली.
स्वातंत्र्याला ५३ वर्ष झाली.
संविधान स्थापनेला ५०.
पण समाजाचे लोक एकत्र यायला उजाडलं २००१ साल त्याची ही गोष्ट.
सांगताहेत ‘उपरा’कार लक्ष्मण माने

-लक्ष्मण माने

एक गाव जेव्हा आयटीचं जंक्शन बनतं

आयटी पार्कमुळे प्रकाशझोतात आलेल्या पुण्याजवळच्या हिंजवडी गावाबद्दल पाच-सात वर्षांपूर्वी कुणाला काही माहीत नव्हतं. आज मात्र हिंजवडी या गावाशेजारी देशातल्या नि जगातल्या नामवंत कंपन्या येऊन ठेपल्या आहेत आणि इथे हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. इथे एक अचाट, अफाट नि झगमगती दुनियाच अवतरली आहे. मात्र गंमत अशी आहे की, या समृद्धीचा हिंजवडी या गावाला स्पर्शही झालेला नाही. शेजारी प्रचंड पैसा नि समृद्धी आलेली असली, तरी हे गाव जसं होतं तसंच राहिलं आहे. किंबहुना अधिकच बकाल बनलं आहे.
एकाच परिसरात दोन स्वतंत्र विश्व इथे कशी नांदत आहेत याचा ‘युनिक फिचर्स’ने घेतलेला शोध. आपल्या देशात प्रगती कशी होते यावर प्रकाश पाडणारा.

-युनिक फीचर्स
ऑगस्ट २००७

इटस् सीसी वर्ल्ड, गाइज...

अखंड तरूणाईने भरलेलं बीपीओ-कॉलसेंटर्स हे एक वेगळंच जग आहे. इथले शिफ्ट अवर्स, इथलं वर्क कल्चर, इथले पगार, सोयी-सुविधा, इथले ताण-तणाव, इथली एन्जॉयमेंट हे सगळं नेहमीच्या व्यावसायिक जगापेक्षा ‘हटके’ आहे.. बाहेरून अद्भुत वाटणार्या या जगाचा आतून फेरफटका!

-अमृता वाळिंबे

मुंबईला जाणारी बस

प्रवासी येत होते तोपर्यंत पारा ४६० सेंटिग्रेड, कदाचित ४७० सेंटिग्रेडपर्यंत पोहोचला. ही मुंबईला जाणारी बस आहे आणि त्यातल्या ५८ सीटस् पूर्ण भरतील. कदाचित बस सुटण्याच्या ठिकाणीच भरतील.
हे तापमानच असं असतं की तुम्हाला इतरांचा दु:स्वास वाटायला लागतो. बस डेपोतून ‘अलंकारिक’ भाषेतले संवाद जोरात ऐकू येत आहेत (आणि बसमधे देखील) आंध्रप्रदेशातल्या एका अत्यंत दरिद्री जिल्ह्यातल्या इतर लाखो लोकांप्रमाणेच हे प्रवासीही आपल्या पायांनी चालत जाऊन मतदान करत असतात. यातले बरेचसे लोक अल्पभूधारक छोटे शेतकरी आणि भूमिहीन मजूर आहेत. सगळ्यात मोठा गट लंबाडा आदिवासींचा आहे. बरेचसे दरिद्री दलितही आहेत. सहन होण्यापलीकडे गेलेल्या परिस्थितीतून हे सर्व बाहेर पडताहेत. एका अंदाजाप्रमाणे या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतीयांश लोक कामानिमित्ताने जिल्ह्याच्या बाहेर आहेत.

-पी. साईनाथ
अंकः जुलै २००३

‘मी’पण विरघळलेला जपान

जॅपनीजमध्ये ‘वाताशी’ या शब्दाचा अर्थ ’मी’ असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ’वाताशी’ या शब्दाचा उपयोग करतात. जिथे मी आवश्यक असतो तिथेही ‘वाताशी’शिवायच क्रियापद वापरता येते.
भाषा हे माणसामाणसातले संवादाचे साधन. आविष्काराचेही साधन. माणसे कशी राहतात, विचार करतात, त्यांचा सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास, या सार्याची ओळख भाषेतून होते. विशिष्ट शब्द, म्हणी, वाक्यप्रचार यातून समाजाचे अधिकच परिपूर्ण दर्शन होत राहते.

-सानिया
अंकः ऑक्टोबर २००१

वैराग्याची कळा विषयांचा सोहळा

सिंहस्थ चालू झालाय. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या गोदेत डुबकी घेण्याची पर्वणी साधण्यासाठी लक्षावधी साधू-महंतांनी, बैराग्यांनी गर्दी केलीय. या निमित्ताने साधुसमागमातल्या एका दिवसाचा हा आँखो देखा हाल!

-निशिकांत भालेराव
अंकः सप्टेंबर २००३

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा