संकीर्ण

शेती पहावी करून

शहरी माणसांना खेड्यांबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळाढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणांमुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातली चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, ही इच्छा तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं.

एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं? शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो? या सा-या अनुभवाने त्यात काय बदल होतो?... लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वत:चा अनुभव.

-श्रीनिवास पंडित
अंकः दिवाळी २००७

विरळा जाहले विद्वान

- अरूण टिकेकर.

समीक्षक अनंत, भाष्यकार कमी; तथाकथित ‘विचारवंत’ वारेमाप, पण खरे सृजक विचारवंत, विद्वान विरळा अशीच आजची आपली स्थिती आहे. सध्याची सामाजिक मनोभूमिका पाहता या स्थितीत लगेच बदल होण्याची शक्यता तर दिसत नाही. पण ही मनोभूमिका लवकरात लवकर बदलणं मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी अत्यावश्यक आहे.

सहिष्णुतेचा जागर

- रंगनाथ पठारे.

आपण ‘कोण’ आहोत याचा शोध.

माझ्या पिढीचा ताळेबंद

- विक्रम गोखले.

आजच्या तरुण पिढीकडे पाहताना कालच्या पिढीला अनेक प्रश्न पडतात. आजच्या पिढीचं वागणं, त्यांचे विचार त्यांना खटकतात. वास्तविक, एक पिढी दुस-या पिढीला घडवत असते. त्यामुळे नव्या पिढीतल्या ब-या -वाईटाचं उत्तरदायित्व आधीच्या पिढीवर येतं. त्याचा स्वीकार करून विक्रम गोखले यांनी आपल्या पिढीच्या कर्तृत्वाचा (!) मांडलेला लेखाजोखा!

- मे २००८.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा