कॉर्पोरेट

ज्याची स्पर्धा स्वत:शीच

- प्रवीण पाटील.

उत्तम कामगिरीचा ध्यास असेल, त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी असेल आणि अंगभूत धडाडी असेल, तर करियरमध्ये वरचं स्थान मिळवण्यासाठी मर्यादित शिक्षण हा अडसर ठरत नाही. केवळ बी.कॉम.पर्यंत शिकलेल्या व वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी ‘टाटा इंडिकॉम’मध्ये हेड-न्यू बिझनेस या पदापर्यंत झेप घेतलेल्या प्रवीण पाटील यांनी कथन केलेला त्यांचा प्रवास.

आणखी मोठ्या रेषेसाठी...

- संजय जोशी.

‘आयडिया’ सारख्या बड्या कंपनीत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सारखे उच्च पद; त्याआधी दहा वर्षांतला कॉर्पोरेट जगात सर्वस्व झोकून देऊन केलेला प्रवास, या जगातले ताणतणाव, राजकारणं वगैरेंवर मात करत, समर्थपणे आव्हानं पेलत साधलेली प्रगती, गलेलठ्ठ पगार, पंचतारांकित जीवनशैली हे सारं सोडून निवृत्त होण्याचा वयाच्या ४३व्या वर्षीच घेतलेला निर्णय... विचारपूर्वक आणि सकारात्मक! काय होतं या निर्णयामागे?

माझा ‘टर्न अराउंड’ अनुभव

- दिलीप शेवडे.

आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या, गाळात रुतलेल्या एखाद्या उद्योगाला खेचून बाहेर काढणं, त्याला पुन्हा स्वबळावर उभं करणं, प्रगतीपथावर मार्गस्थ करणं हे काम सोपं नाही. इंग्रजी भाषेत याला ‘टर्न अराऊंड’ असं म्हणतात. या अवघ्या दोन शब्दांच्यामध्ये डोंगराएवढं प्रचंड आणि खडतर आव्हान दडलेलं आहे. व्यवस्थापकीय कौशल्याची कसोटी पाहणारं हे आव्हान सध्या लार्सन ऍण्ड टुब्रो या नामवंत कंपनीत उच्च पदावर असलेले दिलीप शेवडे यांनी पूर्वी एका कंपनीत यशस्वीपणे पेललं होतं, त्याची ही कहाणी.. त्यांच्याच शब्दांत!

- फेब्रुवारी, २००८.

बिनामस्टरची कंपनी

- मिलिंद सरवटे.

तेराशे कर्मचारी काम करत असलेली एखादी कंपनी बिना मस्टरची चालते असं जर कोणाला सांगितलं, तर त्या व्यक्तीचा चटकन विश्वास बसणार नाही. शिवाय एवढं करून ती कंपनी वर्षाला एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा नफा मिळवते असं सांगितलं, तर ती चक्क थापच वाटेल. पण हे प्रत्यक्षात घडतं आहे. फार दूर नाही, तर आपल्या मुंबईतच. ‘सफोला’ आणि ‘पॅराशूट’ सा-या नामवंत ब्रॅड्सची मालकी असलेल्या ‘मॅरिको’ या कंपनीनं हा चमत्कार प्रत्यक्षात साकारला आहे.

कसा, ते सांगत आहेत या यशस्वी प्रयोगाचे एक शिल्पकार आणि ‘मॅरिको’च्या एच आर आणि स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख मिलिंद सरवटे...

- जानेवारी, २००९.

मी अनुभवलेली देशोदेशीची कार्यमानसिकता

-विलास ढवळे.

विलास ढवळे हे ‘लॉर्ड इंडिया केमिकल्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. कामाच्या निमित्ताने त्यांचा जगातल्या अनेक देशांशी, विशेषतः अमेरिका, जपान,ब्रिटन, जर्मनी अशा प्रगत देशांशी संबंध आला. त्या त्या देशातील कॉर्पोरेट क्षेत्राशी व्यवहार करताना त्यांना तिथल्या कार्यमानसिकतेचा-कार्यसंस्कृतीचा परिचय घडला. त्याचं हे अनुभव कथन!

- जानेवारी, २००८.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा