महाराष्ट्र आणि मराठी

मराठीची मास्तरकी

वडील शिक्षक, त्यामुळे खडू खूप मिळायचे. शाळेतून घरी आल्यावर वडील त्यांचा नेहरु शर्ट खुंटीला ठेवत. त्यांच्या दोन्ही लोंबत्या खिशात हमखास खडू असायचे. ते खडू मी हक्कानं काढून घ्यायचो. या खडूंनी, आईनी सारवलेल्या भिंतीवर आणि ओसरीवरही चित्र काढत सुटायचो. बरेचदा भलामोठा गणपती ओसरीवर काढल्यामुळे तिथून वावरताना त्रास व्हायचा. कारण गणपती पायदळी तुडवला जाण्याची पापयुक्त भीती प्रत्येकाला असे. त्यामुळे मला शिव्याही खाव्या लागत. अर्थात, माझ्या चित्रकलेचं कौतुकही होई. मी मोठेपणी चित्रकार होणार असं बर्याचजणांचं माझ्याबाबतीत भविष्य होतं. लहानपणी गावातल्या कितीतरी तुळशीवृंदावनावर मी काढलेले राधा-दामोदर उभे होते. नागपंचमीचे नाग, मुहूर्ताचा गणपती (याच्या बेंबीला गूळ-सुपारी चिकटवत), चुना मारलेल्या कित्येक भिंतींवर ‘सुस्वागतम’, ‘शुभ-लाभ’, ‘शुभविवाह ’, ‘या बसा नमस्कार!’ असं अक्षरलेखन भरात होतं. ही चित्रकारिता पुढं फार काही टिकली नाही. पण त्या खडूचं पांढरेपण मात्र हाताला कायम राहिलं. म्हणजे मी मास्तर झालो. वरिष्ठ महाविद्यालयात. मराठी शिकवणारा मास्तर! झालेली जडण-घडण, वाचण्या-लिहिण्याचा लागलेला नाद व एकूण स्वभाव पाहता प्राध्यापकी मला जवळची वाटली. मला ती गुणवत्ता निकषावर मिळाली, मी स्वीकारली.

-दासू वैद्य
अंकः एप्रिल २००६

मराठीच्या नावाने वार्षिक रडगाणं - जयदेव डोळे

मराठी मरणासन्न अवस्थेत आहे, मराठी कशी जगणार? आपल्या मायबोलीचं काय होणार? असा जाहिरपणे आक्रोश मांडणं, ही मराठी साहित्य संमेलनांची ‘खासियत’झाली आहे. ही परंपरा दीर्घकाळ चालू आहे. संमेलनांचे अध्यक्ष तर मराठी भाषेच्या भवितव्याचा उच्चार केल्याशिवाय आपलं भाषण पूर्णच करू शकत नाहीत. विद्यमान संमेलनाध्यक्ष अरुण साधू हेही अनेक वर्षांपासून सातत्याने मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत.
मराठीला ‘अतिदक्षता विभागा’त भरती केल्याचं हे दृश्य केवळ पुण्या-मुंबईच्या चष्म्यांमधूनच दिसत आहे काय? उर्वरित महाराष्ट्राला याबद्दल काय वाटतं?

-जयदेव डोळे
अंक: फेब्रुवारी २००७

मराठीचे मारेकरी कोण?

पुण्या-मुंबईत कोणतीही दोन माणसं एकत्र भेटली, की गप्पांमध्ये त्यांचं एका विषयावर एकमत असतं. इंग्रजी-हिंदीचं आक्रमण पाहता मराठी भाषेचं काही खरं नाही, असं त्यांना वाटत असतं. मराठी भाषा टिकेल का असा प्रश्न त्यांच्या मनात उमटत असतो आणि मराठीचा ह्रास होणार याविषयी खात्री असते.

आपली भाषा धोक्यात आहे या जाणीवेने असे लोक अस्वस्थ होतात नि मराठी वाचवायच्या मागे लागतात. इंग्रजी-हिंदी या भाषांमुळे मराठीची पीछेहाट होते आहे, असं अनेकांना वाटत असल्यामुळे एकमेकांशी नि परभाषिकांशी मराठीत बोलून किंवा दुकानांच्या पाट्या मराठीत लावून मराठी टिकेल असं त्यांना वाटून जातं.

अशा प्रयत्नांनी मराठी टिकेल का? मुळात मराठीच्या अस्तित्त्वाचा यक्षप्रश्न तयार झाला आहे का? झाला असल्यास कसा, का आणि कुणामुळे? मराठीच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? मराठीचा उत्कर्ष करायचा नि नव्या जगाच्या नव्या व्यवस्थेत तिला मानाने पुढे न्यायचं तर काय करावं लागेल?

-सुहास कुलकर्णी
अंकः मार्च २००६

आखूड लोकांचा प्रदेश

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन पन्नास वर्षं झाली. विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात ‘नंबर वन’कसा आहे हे तर सतत सांगितलं जात असतंच. परंतु महाराष्ट्राचा ज्ञानेश्वर-तुकारामांपासून शिवाजी महाराजांपर्यंतचा, नि महात्मा फुले-बाबासाहेब आंबेडकर-विठ्ठल रामजी शिंदेंपासून भाऊराव पाटील- विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पर्यंतचा इतिहास पाहिला, तर महाराष्ट्राची गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे नाकर्तेपणात गेलेली दिसतात. ऐतिहासिक वारसा न पेलणं, ख-या मानबिंदूंना मखरात बसवून भुरट्यांनाच डोक्यावर घेणं आणि सर्वच क्षेत्रात मर्यादित कुवतीमुळे महाराष्ट्राचं वैचारिक-सामाजिक-सांस्कृतिक विश्व दिवाळखोरीत निघणं अशा गोष्टी या काळात घडलेल्या दिसतात. महाराष्ट्राच्या किरट्या अर्थव्यवस्थेमुळे अज्ञ मराठीजन भौतिक दारिद्र्यात अडकले तर शिकलासवरलेला सुदृढ मध्यमवर्ग आपल्यातील वैचारिक दारिद्य्रालाच कवटाळून बसला. या सा-यातून महाराष्ट्र हा एक आखुड लोकांचा प्रदेश बनला. त्यामुळे थिल्लर, भोंगळ, अर्वाच्य आणि उथळ व्यवहारच समाजमान्य बनले. परंतु गेल्या अर्धशतकात असं काही झालं आहे, हेही कुणाच्या गावी नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या तुता-या फुंकत असताना मराठी संस्कृतीचा उडालेला बोजवारा माहिती असावा, यासाठी सुहास पळशीकर यांनी २००७ मध्ये लिहिलेला हा लेख वाचलाच पाहिजे असा.

महाराष्ट्राचे पाऊल पडले मागे...

पन्नास वर्षांपूर्वी समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन महाराष्ट्राची वाटचाल रुजली. आज या वाटचालीकडे वळून पाहताना स्वप्न आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत पडल्याचं दिसतं. या सा-या प्रवासात महाराष्ट्राचं पाऊल पुढं पडल्याचा गाजावाजा होत असताना तो खरा आहे का असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. गेल्या दोनचारशे वर्षांत देशाला वैचारिक-सामाजिक-राजकीय नेतृत्व देणा-या महाराष्ट्राचा वारसा गेल्या पाच-पन्नास वर्षांत थिटा का पडला, या प्रश्नाचा परामर्श घेणारा लेख.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा