परिवर्तन

आत्महत्याग्रस्त विदर्भासाठी मूळगव्हाणतंत्र - मुकुंद कुलकर्णी

समाजाने हीन ठरवलेल्या कुष्ठरोग्यांना; उपेक्षित अपंगांना आणि निराधारांना समाजात ताठ मानेने उभं राहण्याचं बळ बाबा आमटे आणि विकास आमटेंच्या ‘आनंदवन’ने दिलं आहे. स्वावलंबनातून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातून नवनिर्माण हे सूत्र ‘आनंदवन’च्या कामामध्ये आढळून येतं. हेच सूत्र घेऊन डॉ.विकास आमटे आणि ‘आनंदवन’चे शंभर कुष्ठरोगी-अपंग आत्महत्येच्या गर्तेत अडकलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारं मॉडेल यवतमाळ जिल्ह्यातील मूळगव्हाण या गावी उभं करत आहेत. डॉ.विकास आमटे यांच्याशी बोलून आणि मूळगव्हाणचा प्रकल्प बघून टाकलेला प्रकाशझोत!

-अनुभव जानेवारी २००८

बंद वाटा आणि कितरूचा मार्ग

- श्रीधर करकरे

भारतीय अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणामुळे सुरुवातीला जरी काहींची चांदी झाली, तरी व्हीआरएसनंतर नि कारखाने बंद पडू लागल्यानंतर जागतिकीकरणाच्या ख-या झळा बसू लागल्या आहेत. गरीब आणि विकसनशील देशांमध्ये येत्या काळात मोठा हाहाकार माजणार आहे. भारत सरकारने जे धोरण अवलंबलं आहे ते पाहता भारतातही तो दिवस दूर नाही, असं काही जाणकार मंडळी सांगू लागली आहेत. जणू सर्व वाटा बंद झाल्या आहेत; पण साè`m संकटावर मात करण्याचं हत्यार मात्र अजून कुणाकडे नाही.

कितरू हा आदिवासी तरुण. त्याच्या गावाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्याने जो उपाय योजला त्यातून शिकण्यासारखं खूप काही आहे, असं स्वदेशी चळवळीतील सक्रिय लेखकाचं म्हणणं आहे.

- ऑक्टोबर २००५.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा