राजकीय

आगामी दशकातील यक्षपेच

राजकीय लोकप्रियता आणि आर्थिक सुधारणा यांचा मेळ कसा घालायचा?

देशाची प्रगती आणि भरभराट व्हायची तर आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम वेगाने राबवायला हवा, अशी धारणा अर्थतज्ज्ञांनी, बुद्धिजीवींनी, राज्यकर्त्यांनी आणि एकूणच अभिजनांनी करून घेतलेली आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील आम माणसांनी - गरिबांनी नकाराचा लाल बावटा दाखवला आहे. आर्थिक सुधारणा श्रीमंतांच्या फायद्याच्या आहेत, त्याचा लाभ गरीबांना होत नाही, असं त्यांना वाटतं असं दिसत आहे.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) या दिल्लीच्या प्रतिष्ठित संस्थेने देशव्यापी सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून अन्य महत्त्वाच्या मुद्यांसोबत आर्थिक सुधारणांसंदर्भात भारतीय मतदारांचा कल समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विविध आर्थिक गटांचा कल समजून घेता ’राजकीय लोकप्रियता आणि आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम यांचा मेळ कसा घालायचा’ हा मूलभूत प्रश्न टोकदार बनल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात निघतो.

या प्रश्नाची चर्चा करत आहेत सीएसडीएसच्या ’लोकनीती’ या सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांच्या गटाचे राष्ट्रीय समन्वयक व राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुहास पळशीकर.

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा