समकालीनची आगामी पुस्तकं

१) प्रख्यात विज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी लिहिलेलं स्वतःचं वाचनचरित्र - लेखकांनी आत्मचरित्र लिहिणं हे आपल्यासाठी नवं नाही. पण निरंजन घाटे यांनी लिहिलंय ते त्यांनी आजवर वाचलेल्या असंख्य पुस्तकांबद्दल, त्यांच्या लेखकांबद्दल आणि ही पुस्तकं मिळवण्याच्या खटाटोपाबद्दल. मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग.

शोधा खोदा लिहा

पुस्तकासंबंधी माहिती
शोधा खोदा लिहा
लेखक: 
संपादक : सुहास कुलकर्णी
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
२४८
पहिली आवृत्ती: 
२६ जानेवारी २०१७
मुखपृष्ठ: 
चंद्रमोहन कुलकर्णी
संक्षिप्त परिचय: 
१९९० ते २०१५ हा पंचवीस वर्षांचा काळ विलक्षण घडामोडींनी भारलेला आहे. जागतिकीकरण, जातीय अस्मिता अन् धार्मिक अभिमान या तीन प्रक्रिया या काळात उलगडल्या. त्याशिवाय गरिबांच्या-वंचितांच्या समस्या, शेतकरी-कामगारांची दुरवस्था, रुढी-परंपरांचा पगडा, स्त्रियांचं दुय्यमत्व, शहरीकरण आणि सर्व स्तरावरील सरकारी अनास्था अशा अनेक प्रश्‍नांनी आपलं जीवन घेरलेलं आहे. समाजाला सतावणारे असे प्रश्‍न समजून घेणं हे ‘युनिक फीचर्स’ने सुरुवातीपासून आपलं काम मानलं. त्यासाठी त्यांचे पत्रकार गटागटाने गावाखेड्यात गेले, वस्त्याझोपड्यांत वावरले, रानावनात फिरले. समाजात जाऊन शोधाशोध केली, प्रचंड लेख लिहिले, दृष्टीआडचे प्रश्‍न वाचकांसमोर आणले. अशा अनेक लेखांपैकी निवडक महत्त्वाच्या आणि संस्मरणीय लेखांचा हा दस्तावेज. समाजाच्या गेल्या पाव शतकाचं आत्मवृत्त सांगणारा.

आमचा पत्रकारी खटाटोप

पुस्तकासंबंधी माहिती
आमचा पत्रकारी खटाटोप
लेखक: 
सुहास कुलकर्णी
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
१९२
पहिली आवृत्ती: 
२६ जानेवारी २०१७
मुखपृष्ठ: 
चंद्रमोहन कुलकर्णी
संक्षिप्त परिचय: 
‘युनिक फीचर्स’ हे नाव वाचत्या महाराष्ट्राला परिचित आहे. एकाच वेळेस वीस-पंचवीस छोट्या-मोठ्या दैनिकांसोबत काम करणारी फीचर्स सर्व्हिस ही या संस्थेची पहिली ओळख. महत्त्वाच्या सामाजिक प्रश्‍नांप्रमाणेच दुर्लक्षित आणि दृष्टिआड झालेल्या विषयांवर केलेलं चौफेर लेखन हे या संस्थेचं वैशिष्ट्य. ‘युनिक फीचर्स’ने महाराष्ट्रातील दैनिकं, साप्ताहिकं, दिवाळी अंक, टीव्ही चॅनल्स, वेबसाइट्स, पुस्तकं अशा सर्व मेनस्ट्रीम माध्यमांतून समाजभान जागं ठेवण्याचं काम केलंच, शिवाय जागत्या वाचकांसाठी हक्काची व्यासपीठंही उभी केली. स्वतःचं मासिक सुरू केलं. स्वतःचे दिवाळी अंक सुरू केले. स्वतःची प्रकाशन संस्था काढत पुस्तकांमधूनही सामाजिक पत्रकारिता करता येऊ शकते हे दाखवून दिलं. पत्रकारितेत स्वतःची वाट चोखाळणार्‍या तरुणांच्या एकत्रित धडपडीतून उभ्या राहिलेल्या एका यशस्वी प्रयोगाची ही गोष्ट. पंचवीस वर्षांच्या पहिल्या टप्प्यातला खटाटोप उलगडून दाखवणारी.

आठवणींचा झोका

पुस्तकासंबंधी माहिती
आठवणींचा झोका
लेखक: 
ना. धों. महानोर
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
८८
पहिली आवृत्ती: 
२६ जानेवारी २०१७
मुखपृष्ठ: 
चंद्रमोहन कुलकर्णी
संक्षिप्त परिचय: 
रानकवी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणार्‍या ना. धों. महानोर यांचं ललित लिखाणही तितकंच सकस आणि मनात रुंजी घालणारं आहे. विशेषतः पळसखेडच्या आठवणींचं अन् तिथल्या गावगाड्याचं वर्णन करताना त्यांचा शब्द न् शब्द जिवंत होतो. या आठवणी म्हणजे केवळ उदास स्मरणरंजन नव्हे. गावखेड्यातलं समृद्ध जगणं भरभरून अनुभवलेल्या, तिथल्या सुख-दुःखाला सहजपणे सामोरं गेलेल्या एका निर्मळ माणसाने उलगडून दाखवलेलं तितकंच निर्मळ जग म्हणजे आठवणींचा झोका. या रानकवीने त्याच्या कवितेइतक्याच रसाळ भाषेत लिहिलेल्या अनुभवांचा हा अस्सल खजिना.

कायमचे प्रश्न

पुस्तकासंबंधी माहिती
कायमचे प्रश्न
लेखक: 
रत्नाकर मतकरी
संपादक: 
संपादन : मुकुंद कुळे
पृष्ठसंख्या: 
२१६
पहिली आवृत्ती: 
२६ जानेवारी २०१७
मुखपृष्ठ: 
चंद्रमोहन कुलकर्णी
संक्षिप्त परिचय: 
ज्या समाजात आपण वाढतो-वावरतो, त्या समाजाचे प्रश्‍न आपलेच आहेत, असं मानणारे लेखक किती असतात? अर्थातच कमी. समाजासाठी जागल्याची आणि मार्गदर्शकाची भूमिका निभावणार्‍या अशा मोजक्या लेखकांपैकी महत्त्वाचं एक नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लोकशाहीच्या गुन्हेगारीकरणापासून श्रद्धेच्या बाजारीकरणापर्यंत, समाजाच्या सांस्कृतिक फुटकळीकरणापासून शासनाच्या निगरगट्टीकरणापर्यंत, साहित्यिकांच्या बोटचेपेपणापासून साहित्यिक व्यासपीठावरील असांस्कृतिक उठबशीपर्यंत अनेक ज्वलंत प्रश्‍नांवर मतकरी स्वतःची भूमिका परखडपणे मांडत आले आहेत. जीवनाविषयीची समग्र समज आणि मनात रुजलेली खोल न्यायबुद्धी या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या भूमिकांना महत्त्व आहे. अशा निर्भीड लेखकाने विविध सामाजिक, राजकीय अन् सांस्कृतिक मुद्द्यांवर कधी दैनिकांमध्ये लेख लिहून, तर कधी भाषणांमधून केलेल्या सडेतोड भाष्याचा दस्तावेज म्हणजे हे पुस्तक. लेखकाचा सार्वजनिक वावर कसा असायला हवा याचा वस्तुपाठ घालून देणारं.

अनुभव फेब्रुवारी २०१७

अनुभव : फेब्रुवारी २०१७

(मुखपृष्ठ चित्र : चंद्रमोहन कुलकर्णी)
••••••

अनुक्रमणिका
संदर्भ मुखपृष्ठ : गौरी कानेटकर
लेख
मोदींची मध्यावधी चिकित्सा : सुहास पळशीकर
वाचन हा माणसाचा महत्वाचा अवयव : भालचंद्र नेमाडे
नोंदी
बाना अलाबेद : आभासी विश्‍वातला मानवी चेहरा : कौमुदी वाळिंबे
तीन औरतें : हीनाकौसर खान पिंजार
सदरं
वर्दीतल्या माणसांच्या नोंदी : 'झेड सिक्युरिटी'च्या अंतरंगात : सदानंद दाते (IPS)
मराठी बिग ब्रँड्स : कॅम्लिन - शाईनिर्मितीचा उद्योग जेव्हा विश्वझेप घेतो : आनंद अवधानी
मालिका
लेन्समधून : दि अनटोल्ड स्टोरी : सायली घोटीकर (अॅब्स्ट्रॅक्ट फोटोग्राफर)
उत्तरांच्या शोधात : आत्महत्यांचं दुष्टचक्र भेदण्यासाठी : कौस्तुभ आमटे
ललित
माकडं : जयंत पवार
बघा बुवा : मुकेश माचकर
अनुभव
निसर्गचित्रकलेचं चिनी गूढ : शर्मिला फडके
मन रुतले क्षण : मुकुंद कुलकर्णी
नवं काही
होल्डॉल : नजरेआड व्हायला नकोत अशा घटना-घडामोडी
धडपड : देशभरातले चांगले प्रयोग प्रयत्न
मनातलं घर : सुरेल घर : श्रीधर फडके
विशेष विभाग - चांगलं चुंगलंः
शिफारस : रस्किन बॉन्ड : गौरी कानेटकर
बुकशेल्फमधून : माय प्लेस : स्वतःच्या मुळांचा भेदक शोध : प्रमोद मुजुमदार
डॉक्युमेंट्री : मीठ पिकवणारी माणसं : निळू दामले
वेबविश्‍व
दखल
पासवर्ड : कुटुंबातील उद्याच्या पिढीसाठी खास विभाग
स्मार्टफोनची गोष्ट : मृणालिनी वनारसे
पाच का दस : सु‘जॉय’ रघुकुल
कविता : झाड - दासू वैद्य

-----------------------------
अनुभवची वार्षिक वर्गणी - 650 रु. (दिवाळी अंकासह)
वर्गणीसाठी संपर्क : मंगेश - 9922433614, सागर - 9820525523
PDF अंकासाठी (वार्षिक वर्गणी - 300 रु.) : anubhav.pdf@gmail.com

कुतूहलापोटी

पुस्तकासंबंधी माहिती
कुतूहलापोटी
लेखक: 
अनिल अवचट
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
२००
पहिली आवृत्ती: 
२६ जानेवारी २०१७
मुखपृष्ठ: 
गिरीश सहस्रबुद्धे
संक्षिप्त परिचय: 
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत! पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच. या आणि अशा प्रश्नांची कोडी अनिल अवचटांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली आणि ही कोडी सहजसोप्या भाषेत उलगडून आपल्यासमोर ठेवली. सजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल, तर थक्क व्हाल गुरू!

विधिमंडळातून

पुस्तकासंबंधी माहिती
विधिमंडळातून
लेखक: 
ना. धों. महानोर
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
१९२
पहिली आवृत्ती: 
१६ सप्टेंबर २०१७
मुखपृष्ठ: 
संदीप साळुंके
संक्षिप्त परिचय: 
राज्यपालांचे नामनियुक्त सदस्य म्हणून दोन वेळा विधान परिषदेवर काम केलेल्या महानोरांनी शेती-पाण्याशी संबंधित अनेक ज्वलंत विषय ऐरणीवर आणले. विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांची हलाखी संपावी यासाठी सरकारला कित्येक योजना सुचवल्या; कित्येक मंजूर करून घेतल्या. दुसरीकडे, महाराष्ट्राचं साहित्य-कलासंपन्न रुप टिकून राहावं यासाठी अखंड धडपड केली. एकूण समाजाचं सांस्कृतिक भरण-पोषण व्हावं, यासाठी अनेक नवनूतन कल्पना मांडल्या आणि सरकारकडून प्रत्यक्षात आणवून घेतल्या. ना. धों. महानोरांनी आमदार म्हणून विधान परिषदेत केलेल्या भाषणांचा हा संपादित दस्तावेज.

अनुभव जानेवारी २०१७

अनुभव जानेवारी २०१७
(मुखपृष्ठ - चंद्रमोहन कुलकर्णी)

अनुक्रमणिका —

संदर्भ मुखपृष्ठ : गौरी कानेटकर

लेख
निश्‍चलनीकरण : काही बाजू
१. नोटाबंदीचा मास्टरस्ट्रोक : प्रदीप आपटे
२. नोटाबंदीमागचं वास्तव : मिलिंद मुरुगकर
३. कॅशलेस सोसायटी : अनुभव आणि आव्हानं

अनुभव
तळ्यात मळ्यात : अमृता सुभाष
मन रुतले क्षण : मुकुंद कुलकर्णी

सदरं
वर्दीतल्या माणसाच्या नोंदी : सदानंद दाते
मराठी बिग ब्रँड्स : आनंद अवधानी

ललित
गोष्ट तशी छोटी :
जयंत पवार
बघा बुवा : मुकेश माचकर

मालिका
लेन्समधून : अभिजीत पाटील
उत्तरांच्या शोधात : कौस्तुभ आमटे

नवं काही
होल्डॉल
धडपड

विशेष विभाग

चांगलं चुंगलं
शिफारस : बाई : मेघना भुस्कुटे
बुकशेल्फमधून : प्रमोद मुजुमदार
वेबविश्‍व

पासवर्ड

कासवाचं गुपित : मृणालिनी वनारसे
धडा : सु‘जॉय’ रघुकुल
कविता : मिशा : दासू वैद्य

अनुभव दिवाळी अंक २०१६

अनुभव दिवाळी अंक २०१६
मुखपृष्ठ चित्र – चंद्रमोहन कुलकर्णी

अनुक्रमणिका

कथा
गॅस चेंबर : रत्नाकर मतकरी
लेखकाचा मृत्यू : जयंत पवार
एक बातमी आणि वाचकांची पत्रे : श्याम मनोहर

अनुभव
मन रुतले क्षण : मुकुंद कुलकर्णी
कुमारांच्या माळव्यात : साधना शिलेदार
पोलंड : एका देशाचा प्रवास : राजेश्‍वरी देशपांडे
निवांत शांत अमेरिका : निळू दामले

माणसं
नमष्कार, मैं रवीश कुमार : श्रीरंजन आवटे
स्टाइनबर्ग : अनिल अवचट
तिथे अंकुरतो अमूर्त विचार : दीपक घारे
मीचि मज व्याले : प्रशांत खुंटे
गुरुजी : सुहास कुलकर्णी

ललित
पुणेरी मेलामेली : मुकुंद टाकसाळे
मिजबान आये है : सुशील शुक्ल

अनुवादित कथा
पवित्र कर्तव्य : इस्मत चुगताई
उनींदी नदी : अजमेर सिद्धू

Syndicate content