स्ट्रेंजर टू हिस्ट्री - आतिश तसीर

STRANGER TO HISTORY

आतिश तसीर हा दिल्लीतल्या एका ज्येष्ठ पत्रकार महिलेचा मुलगा. आई शीख आणि वडील पाकिस्तानी मुस्लिम. आई-वडिलांचं लग्न झालं नाही, त्यामुळे आतिश त्याच्या आईकडेच वाढला. आईने त्याला वडिलांचा धर्म लावला, त्यांचं नाव लावलं, पण वाढवलं मात्र धर्मनिरपेक्ष वातावरणात. आतिशने वडिलांना भेटू नये, राजकारणात असलेल्या त्याच्या वडिलांना त्यामुळे त्रास होऊ शकतो, अशी आतिशच्या आईची भूमिका होती. आतिशचे वडील व्यक्तिशः धार्मिक नसले तरी ते पाकिस्तानातल्या इस्लामिक राज्यसत्तेचे पुरस्कर्ते होते. आपण मुस्लिम असलो तरी आपल्या वडिलांशी आणि त्यांच्या देशातल्या इतर मुस्लिमांशी आपण स्वतःला रिलेट करू शकत नाही, असं त्याला वाटत होतं.

ही सगळी गुंतागुंत समजून घेत आतिश वाढला, तेव्हा त्याला अनेक प्रश्‍न पडू लागले. एकीकडे हे प्रश्‍न खाजगी होते, तर दुसरीकडे त्या प्रश्‍नांना धर्माचा, भारत-पाकिस्तान माळणीचा, मुस्लिम देशांमधली अतिरेकी हिंसाचारी विचारसरणीचा संदर्भ होता. स्वतःला पडलेल्या भावनिक आणि वैचारिक अशा दोन्ही प्रश्‍नांचा शोध घेणसाठी आतिशने मुस्लिम देशांमध्ये प्रवास करायचं ठरवलं. केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर इस्लाम राजवट असणा-या शक्य त्या सर्व देशांमध्ये फिरायचं, लोकांशी बोलायचं आणि ही गुंतागुंत समजून घ्यायची, असं त्याने ठरवलं. त्या प्रवासाची हकीकत म्हणजे हे पुस्तक. तुर्कस्तान, सिरीया, सौदी अरेबिय, इराण आणि पाकिस्तान या देशात आतिश भटकला. तिथल सर्वसामान्य लोकांशी, विशेषतः तरुणांशी त्याने गप्पा मारल्या. त्यांची इस्लामबद्दलची मतं जाणून घेतली, आधुनिक जगाबद्दल, धर्मनिरपेक्षतेबद्दल, आर्थिक उदारीकरणाबद्दल त्यांना काय वाटतं हे समजून घेतलं आणि कोणतीही जास्तीची टीका-टिपणी न करता हा सारा वृत्तांत पुस्तकातून मांडला.

एकीकडे या पुस्तकात तरुण समाजमनाची स्पंदनं जाणवतात, तर दुसरीकडे या प्रवासाला आतिशच्या खाजगी आयुष्याची झालर आहे. त्याला आपल्या वडिलांबद्दल वाटणारं प्रेम आणि कुतूहल सतत जाणवत राहतं. आपलं आणि आपल्या वडिलांचं नातं हे केवळ बापाने नाकारलेला मुलगा असं नसून त्याला दोन देशांमधल्या राजकीय संबंधांचा, इस्लामिक विचारसरणीचा संदर्भ आहे हे समजून घेणारा हा प्रवास आपलं अनुभवविश्व समृद्ध करणारा आहे.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content