साहित्य संमेलन आणि एन. आर. आय. - मोहन रानडे

मराठी माणूस परदेशी गेला तेव्हा सांस्कृतिक चळवळीतील पहिली गोष्ट त्याने केली ती नाटक बसविण्याची. आता दुसरी पिढी परदेशी स्थायिक होत आहे आणि त्यांच्यामध्ये पण ही नाटक बसविण्याची उर्मी आहे हे पाहून आनंद होतो. जी गोष्ट नाटक बसविण्याची तीच संमेलने भरवण्याबद्दलही खरी ठरत आहे. अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने 1984 साली पहिले सार्वजनिक संमेलन भरवले. आज 30 वर्षानंतर ती परंपरा उत्तम रितीने चालू आहे. यंदाचे संमेलन 5000 लोकांच्या उपस्थितीत लॉस एंजेलिस येथे जुलै 2 ते 5 भरेल. अशा प्रकारची संमेलने आता युरोप आणि ऑस्ट्रेलियातसुद्धा भरत आहेत.

साहित्य हा सांस्कृतिक जीवनाचाच एक भाग असल्याने अशा संमेलनातून करमणुकीच्या कार्यक्रमांबरोबरच सहित्यालासुद्धा चांगल्या प्रकारचा वाव आत्तापर्यंत मिळाला आहे. अमेरिकेतील पूर्वीच्या अनेक संमेलनांचे अध्यक्ष अथवा प्रमुख वक्ते लेखकच होते.

परदेशस्थ लेखकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध प्रकारचे उपक्रम आत्तापर्यंत हाती घेतले गेले आहेत. अशा लेखकांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. अनेक परदेशी मराठी लेखकांची पुस्तके नियमितपणे प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्था महाराष्ट्रात आहेत. उत्तर अमेरिकेत सध्या 40च्या वर मराठी मंडळे आहेत. बहुतेक मंडळांचे वार्षिक दिवाळी अंक तर प्रकाशित होतात. शिवाय अनेकांची द्वैमासिके निघतात. मधून मधून स्थानिक साहित्यिकांच्या बैठकी होतात. ज्यामध्ये लेखक-कवि आपले साहित्य सादर करतात. यंदाच्या बृ-मंडळाच्या संमेलनात उत्तर अमेरिकेतील ज्या लेखकांची गेल्या दोन वर्षांत पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तांत्रिक सुधारणांमुळे साहित्य प्रकाशनातसुद्धा अनेक प्रकारच्या सुधारणा झाल्या आहेत. छापील पुस्तकांना ई-बुकचा पर्याय उपलब्ध असून तो लोकप्रिय होत आहे. अनेक दैनिके छापील आवृत्तीबरोबरच संगणकावर उपलब्ध झाली आहेत. बोली भाषा कळते पण वाचता येत नाही अशी एक नवीन पिढी तयार होत आहे. त्यांचेसाठी ऑडिओ-बुक हा प्रकार उपलब्ध होत आहे. द.मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी, व. पु. काळे, विजय तेंडुलकर आणि यंदाचे अध्यक्ष अच्युत गोडबोले अशी काही उदाहरणे घेता येतील. साहित्य संमेलनांप्रमाणेच याही संमेलनात पुस्तक प्रदर्शन हा संमेलनांचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहे. पुस्तक विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो असा अनुभव आहे.
मराठी माणूस परदेशी गेला की साहजिकच त्याचा रोजच्या व्यवहारात मराठी भाषेशी संपर्क तुटतो आणि साहजिकच आहे. हे सध्या महाराष्ट्रातही घडत आहे असे दिसते. अशा परिस्थितीत आपली भाषा टिकून रहावी असे ज्यांना मनापासून वाटते ते मराठी भाषा घरात, मित्रांमध्ये बोलत राहतात. संधी मिळेल तसे मराठी भाषेत लिहित राहतात. अशा लेखनाला संघटित रूप यावे म्हणून उत्तर अमेरिकेत एकता, बृहन्महाराष्ट्र वृत्त आदी त्रैमासिके, मासिके गेली 30 वर्षे सातत्याने प्रकाशित होत आहेत ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.

पण भाषा टिकण्यासाठी साधनांची कमतरता आहे असे नाही. तर मराठी म्हणून जन्माला आलेल्यांनी त्या भाषेचा अभिमान बाळगणे जास्त जरुरीचे आहे. तो अभिमान अंगी असला तर त्या भाषेत बोलण्याचे, लिहिण्याचे प्रयत्न होतील. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके जगभरातील लेखकांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम करीत आहेत. वाचक वर्ग वाढणे महत्त्वाचे आहे. भाषेचा अभिमान सर्वत्र वाढला तरच ते शक्य आहे.

साहित्य संमेलनांना पूर्वी महत्त्व मिळत नव्हते तेव्हा अध्यक्षपदासाठी एवढी चुरस, राजकारण दिसत नव्हते. त्याला महत्त्व प्राप्त झाल्यावर हे वाईट प्रकार त्यात घुसले. मराठी भाषेबद्दल आपुलकी वाटण्यास हे प्रकार मदत करीत नाहीत आणि सर्वसामान्य वाचक त्याकडे दुर्लक्षच करतो.

मराठी साहित्य समृद्ध करण्यास प्रत्येकाने त्याचे अनुभव, विचार, त्या भाषेत व्यक्त करणे, कागदावर अथवा संगणकावर रेखाटणे महत्त्वाचे आहे. ते जोपर्यंत होत राहिल तोपर्यंत ही भाषा नुसती टिकून राहणार नाही तर समृद्ध होईल हे निश्चित.
-मोहन रानडे
neelamvdo@gmail.com

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content