साहित्य संमेलन आणि अनिवासी भारतीय - नीलिमा कुलकर्णी

साहित्य संमेलने म्हणजे भांडणे, चढाओढ आणि गदारोळ अशी एक कल्पना बाहेरून पहाणाऱ्या सगळ्या मराठी माणसांची असते. अनिवासी भारतीय त्याला अपवाद नाही. २०१२ साली टोरांटोला विश्व साहित्य संमेलनाचे मला आमंत्रण आले तेव्हा मला अतिशय आनंद झाला होता. भारतातील साहित्यिकांशी गप्पा करून विचारांची देवाणघेवाण होईल असे वाटले. महाराष्ट्राबाहेर आयोजित केलेले हे सम्मेलन बाकीच्या भानगडीपासून दूर असेल अशी आशा ठेऊन मी आमंत्रण स्वीकारले. कवी संमलेनात मी भाग घेणार आहे असे मी सर्वाना माझ्या भारतातील नातेवाइकांना सांगितले तेव्हा कळले की ‘सम्मेलन तर रद्द झाले आहे.’ रद्द झाले या धक्क्यापेक्षा आम्हाला हे कळवलेले नव्हते याचे वाईट वाटले. सगळी ई-वृत्तपत्रांमधून मी चाललेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादांची माहिती करून घेतली, तेव्हा खरोखरच साहित्य संमलेनाची गरज नाही अशा निर्णयाला पोहोचले. टोरांटोच्या समितीशी संपर्क साधला तेव्हा कळले की कुठल्याही परिस्थितीत सम्मेलन हे होणारच. अंतर्गत राजकारणामुळे शेवटपर्यंत सम्मेलन होणार की नाही अशी धाकधूक होती. दोलायमान अवस्थेत सम्मेलनाला जाऊ इच्छिणाऱ्यांची फारच कुचंबणा झाली. विमानाची तिकिटे रद्द करावी की काय? या गोंधळात सम्मेलनाचा उत्साह पूर्ण गळून पडला. शेवटी भारतातील साहित्यिकाशिवाय ‘साहित्य- संस्कृती’ संमेलन चांगले झाले. पण एक कडवट चव ओठावर राहिली. असा मनस्ताप करून सम्मेलने होत असतील तर त्यांची खरंच गरज नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे परदेशात आलेल्या मराठी माणसांमध्ये फारच थोडे साहित्यप्रेमी आहेत. अमेरिकेत वाढणाऱ्या दुसऱ्या पिढीला मराठीत गम्य नाही. आणि H1 विसावर आलेल्या भारतात वाढलेल्या तरुण पिढीलाही त्यात फारसे सारस्य नाही. बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात ३-४ हजार लोकांमधून कविसंमेलनाला २५-३० च्या वर उपस्थिती नसायची. मराठी विश्व व महाराष्ट्र मंडळ ‘रंगदीप’ हा दिवाळी अंक मिळून काढतात. पण दरवर्षी अंक काढायचा की नाही यावर चर्चा होते. थोडक्यात, सामान्य मराठी माणसाला मराठी साहित्याबद्दल अनास्था आहे. ज्या लोकाना साहित्यात रस आहे ती माझ्यासारखे हौशी लेखक अमेरिकेतून निघणाऱ्या वेगेवेगळ्या मासिकांमधून ‘रंगदीप’ (वार्षिक), बृहन्महाराष्ट्रवृत्त (मासिक), अंतराळ(ई-मासिक), स्नेह्गंध, एकता(त्रैमासिक) ई. नियतकालिकांमधून लिहित असतात. बुकगंगा आणि अनेक मराठी पुस्तकांच्या वेबसाईट वरून पुस्तके मागवता येतात. मराठी विश्वाची २-३ हजार पुस्तकांची लायब्ररी आहे. काही दुर्मिळ पुस्तके, संदर्भ ग्रंथ तिथे मिळू शकतात. काही विद्यापीठांच्या लायब्ररीमध्ये ही मराठी पुस्तके आहेत. ई-सकाळ, ई-लोकसत्ता वगैरे भारतातील वृत्तपत्रांमधून इतर माहिती मिळत असते.
आम्हाला ज्या गोष्टींची उणीव जाणवते त्या अशा!
१. मराठी वाङ्मयातील नवे प्रवाह
२. मराठी शुद्धलेखनाचे नियम
३. मराठी साहित्यातील काही वादग्रस्त साहित्या/विषयाचा उहापोह.
हे विषय ई-सम्मेलनाने हाताळावेत असे मला वाटते. याशिवाय जशी साहित्य सम्मेलनात नवी पुस्तके उपलब्ध असतात त्यांची माहिती द्यावी. भारत- भेटीत मराठी पुस्तके शोधीत होते. पुण्यात किवा नागपूरला मला ती मिळू शकली नाहीत. मामा दांडेकरांची श्री संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेची प्रत कुठेही मिळाली नाही. ती आळंदीला जाऊन आणावी लागली. बेलसरे यांची आध्यात्मिक पुस्तके अतिशय सुंदर आहेत. पण ती आउट-ऑफ-प्रिंट आहेत. तशी पुस्तके कशी मिळवावी याचे मार्गदर्शन हवे.
साहित्य सम्मेलनात मराठीचे बदलणारे रूप यावर चर्चा व्हावी. मराठीवर इंग्लिशचे झालेले आक्रमण थांबावायला पाहिजे. ‘सकाळ टुडे’ ‘लोकसत्ता ‘केजी टू कॉलेज” असे मथळे वाचून मराठीची कींव येते. प्रत्येक शब्दाला संस्कृती असते. जे इंग्लिश संस्कृतीतून आलेले आहेत, उदाहरणार्थ इंटरनेट, कॉम्प्युटर, ते शब्द तसेच्या तसे घ्यावे, उगाच त्याचे मराठीकरण करू नये. पण मुळात ज्याला पर्यायी मराठी शब्द आहेत ते डावलून इंग्लिश शब्द घुसडू नये. दुसरे म्हणजे, मराठी साहित्यात दलित साहित्याने, दया पवार च्या ‘बलुतं’ सारख्या कादंबरीने त्या संस्कृतीतल्या शब्दांची मोलाची भर साहित्यात घातली. तसे जर काही नवे साहित्य, शब्द नव्या लेखकांच्या साहित्यातून आले असतील तर त्या मराठीच्या रुपाची ओळख करून द्यावी.
-नीलिमा कुलकर्णी,
क्लार्क्सबर्ग, न्यूजर्सी

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content