विद्युलता कानेटकर-महाबळ

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ई-संमेलनांबद्दलची माहिती परदेशस्थ मराठी लोकांपर्यंत कशी पोचवता येईल, ह्या बद्दल विचार व्हायला हवा. मी जवळपास १० ते १२ वेगवेगळ्या वयोगटांमधल्या लोकांना ई-संमेलनांबद्दल विचारले पण त्यांना त्याबाबत माहिती नव्हती. याच्याच अनुषंगाने, परदेशस्थ मराठी लेखंकांना/त्यांच्या लिखाणाला यात कसे सहभागी करुन घेता येईल, हे ही विचारात घ्यायला हवे.

लक्षवेधी साहित्य म्हणून निवडक साहित्याचं कलात्मक सादरीकरण पाहायला आवडेल. हे सादरीकरण इंटरनेट ह्या माध्यमातील दृकश्राव्य सोयी वापरुन वेगवेगळ्या पध्दतीने करता येऊ शकेल. यात जास्तीत जास्त लोकांना (लेखक नसलेले) एकत्र आणता येईल. यातून चांगला वाचकवर्ग निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यांची आखणी करता येईल.

प्रत्येक साहित्यप्रकाराची आवर्जून दखल घेतल्या जावी म्हणून प्रयत्न व्हावेत.

ह्या संमेलनाचा भाग म्हणून, मराठी साहित्यासंबधित एखादा ऑनलाईन कोर्स किंवा वर्कशॉप आयोजित करता आले तर उत्तम. त्या द्वारे नविन लेखकांना मार्गदर्शन मिळू शकेल.

हे संमेलन फक्त मराठी साहित्यापुरतं मर्यादित न राहता इतर भाषांमधून मराठीत अनुवादित झालेलं तसंच मराठीतून इतर भाषांत भाषांतरित झालेल्या साहित्याचा सुद्धा ह्या संमेलनात समावेश व्हावा.

बरेचदा वाचन करण्यापेक्षा इतर कामे करित असतांना ऐकणे सोयीचे पडते, तेव्हा संमेलनातील एक तरी विभाग किंवा महत्वाचे लेख/भाषणे ऑडिओ किंवा पॉडकास्ट स्वरुपात उपलब्ध करता आल्यास ते नक्कीच जास्ती लोकांपर्यंत पोहचू शकेल.

परदेशात राहून भारतात होत असलेल्या मराठी साहित्य निर्मीतीबद्दल माहिती मिळविणे ह्या संमेलनाद्वारे सुलभ केल्या जाऊ शकेल.

-विद्युलता कानेटकर-महाबळ

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content