इन गुड फेथ - साबा नक्वी

IN GOOD FAITH - SABA NAQVI

`इन गुड फेथ - अ जर्नी इन सर्च ऑफ अननोन इंडिया` हे रूपा पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं सबा नक्वी लिखित पुस्तक म्हणदे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा तिन्ही धर्मांतल्या संमिश्र जनश्रद्धांचा धांडोळा घेणारा रिपोर्ताज आहे.
देशपातळीवरील प्रसिद्ध पत्रकार आणि आऊटलूक या पाक्षिकाच्या राजकीय संपादक सबा नक्वी या स्वतः मुस्लिम-ख्रिश्चन अशा संमिश्र कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या. काही काळ विवाहामुळे उदारमतवादी हिंदू कुटुंबाचाही त्या भाग होत्या. १९८५ पासून सुरू झालेलं रामजन्मभूमी आंदोलन आणि तेव्हापासून देशात उसळलेल्या धार्मिक उन्मादाच्या त्या सजग साक्षीदार. बाबरी मशिदीचा विध्वंस, १९९२-९३ च्या दंगली, बाँबस्फोट, गुजरातमधील मुस्लिमांचा नरसंहार, सततचे धार्मिक ताण-तणाव. हिंदू-मुस्लिम धार्मिक पुनुरुज्जीवनवादी शक्तींचा वाढता प्रवाह यामुळे त्या अस्वस्थ होत होत्या. आपला देश खरोखरच सेक्युलर आहे का भारतीय नागरिकांची धार्मिक अस्मिता नेमकी काय आहे, याविषयी त्यांना प्रश्न पडत होते.
त्यातूनच सुरू झाला एक शोध. सबा नक्वी दोन वर्षं देशाच्या कानाकोप-यात फिरल्या. तामिळनाडू, केरळ ते ओरिसा आणि महाराष्ट्रापासून राजस्थानापर्यंत फिरून त्यांनी संयुक्त धार्मिक परंपरांचा, प्रथांचा शोध घेतला. या प्रवासात त्यांना प. बंगालमधील पटचित्रकार समाज भेटला. हा समाज एकाच वेळी हिंदू आणि मुस्लिम नावं लावणारा आणि दोन्ही धर्मांमधील प्रथांचं पालन करणारा. तामिळनाडूच्या श्रीरंगम मंदिरात त्यांना भगवान विष्णूची एक सखी मुस्लिम राजकन्या असल्याचं दिसून आलं.
महाराष्ट्रात मढी आणि हाजी मलंग ही नाथपंथीय जत्रा आणि उरुस एकत्रित साजरे करणारी देवस्थानं त्यांना सापडली. अशा अनेक ठिकाणांना नक्वी यांनी भेटी दिल्या. तिथल्या सर्वसामान्य लोकांशी त्या बोलल्या. त्यामुळे संयुक्त धार्मिक जनश्रद्धांचा भलामोठा पट या पुस्तकातून उलगडला आहे. नक्वी यांनी या श्रद्धांमागच्या मानवी भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याला एक व्यापक परिमाण लाभलं आहे.
आपल्या देशातल्या आजच्या अस्वस्थ वर्तमानाच्या तळाशी एक सुदृढ, उदारमतवादी, सहिष्णू परंपरा आहे. ही परंपरा या देशातल्या अगदी सामान्य गरीब नागरिकांमुळेच टिकून आहे. कारण त्यांच्यासाठी रोजच्या जगण्यासाठी कराव्या लागणा-या संघर्षात धर्मश्रद्धा आणि ईश्वरश्रद्धा आत्मिक बळ देणारी शक्ती आहे, सत्तेचं साधन नव्हे. हे उलगडून दाखवणारं इन गुड फेथ हे पुस्तक अर्थपूर्ण पत्रकारितेचं आश्वासक उदाहरण आहे.
लेखन - प्रमोद मुजुमदार

(या पुस्तकाचा प्रमोद मुजुमदार यांनी केलेला अनुवाद समकालीन प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होणार आहे.)

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content