अनिल अवचट - समाजभान देणारा अवलिया

पाचव्या ई-संमेलनाचे अध्यक्ष अनिल अवचट
(जन्म - २६ अॉगस्ट १९४४)

अनिल अवचट

मध्यमवर्गीय समाजाच्या विचारविश्‍वात नसलेलं कष्टकर्‍यांचं अंधारं जग आपल्या लिखाणातून समोर आणणारे मराठीतले आद्य लेखक म्हणून अनिल अवचट यांचं नाव घ्यावं लागेल. अवचट हे शिक्षणाने डॉक्टर, पण शिक्षण संपल्यावर डॉक्टरकीकडे न वळता ते सामाजिक संघटना आणि चळवळींमध्ये सहभागी झाले. युक्रांद, एक गाव एक पाणवठासारख्या घुसळणीमधून त्यांना गरीब, वंचित आणि गावकुसाबाहेर फेकल्या गेलेल्या समाजाचं दर्शन झालं. हे धगधगीत वास्तव त्यांनी माणूस, साधना, मनोहर, किर्लोस्कर या तेव्हाच्या नियतकालिकांमधून लिहायला सुरुवात केली आणि मध्यमवर्गीय वाचकांच्या झापड लावलेल्या दृष्टीला एक सणसणीत चपराक बसली. अवचटांच्या लिखाणाची शैलीही अशी होती की जणू एखाद्या डॉक्युमेंट्रीप्रमाणे ते जग आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागावं. या लिखाणातून त्यांनी हमाल, देवदासी, भटके-विमुक्त, बिडी कामगार अशा विविध घटकांच्या समस्यांना आवाज दिला. या पुस्तकांनी गेली चार दशकं वाचकांच्या अनेक पिढ्यांचंं अनुभवविश्‍व विस्तारलं. त्यांना समाजभान दिलं.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात काम करणार्‍या विविध व्यक्ती आणि संघटनांना समाजासमोर आणण्याचं महत्त्वाचं कामही अवचट यांनी ‘कार्यरत’ सारख्या पुस्तकांतून केलं. तसंच समाजाला भेडसावणार्‍या पर्यावरण र्‍हासासारख्या प्रश्‍नांनाही त्यांनी आपल्या लेखांमधून वाचा फोडली. अवचटांनी बालवाङ्मयही तितकंच समरसून लिहिलं असून त्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
सुरुवातीला सामाजिक चळवळीतून लिखाणाकडे वळलेल्या अवचटांच्या लिखाणातूनच पुढे नवं कामही उभं राहिलं. व्यसनी जगाचा मागोवा घेणारं लेखन करत असतानाच पत्नी डॉ. सुनंदा यांच्या पुढाकाराने त्यांनी ‘मुक्तांगण’ ही स्वतंत्र संस्था स्थापन केली. सुनंदा यांच्या निधनानंतर या केंद्राची जबाबदारी समर्थपणे पेलली. शास्त्रीय पद्धत आणि प्रेमाचा स्पर्श यांची योग्य मात्रा असलेलं मॉडेल राबवून ‘मुक्तांगण’ने गेल्या 25 वर्षांमध्ये हजारो व्यसनी तरुणांना नवं आयुष्य प्राप्त करून दिलं आहे.
अवचटांचं आणखी एक रूप म्हणजे कलेचे निरनिराळे प्रांत धुंडाळणारा आणि त्यासोबतीने आयुष्याचा आनंद घेणारा स्वच्छंदी कलावंत. ते जितके मनस्वी लेखक आहेत तितकेच अस्सल चित्रकार. लाकडातूनही त्यांनी कमालीची प्रयोगशील शिल्पं साकारली आहेत. त्यांचं ओरिगामी प्रेम तर सर्वज्ञात आहे. स्वतः ओरिजनल डिझाइन तयार करणार्‍या जगातल्या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांच्या ओरिगामी कलाकृती खास जपानच्या ओरिगामी मंडळातही ठेवण्यात आलेल्या आहेत. एका माणसात किती कला असू शकतात, याचं अवचट हे एक चकित करणारं उदाहरण आहेत. वयाच्या सत्तरीतही ते सतत नवं काही शिकत असतात. गाणं शिकतात, बासरी वाजवतात. नवे विषय समजून घेण्यासाठी धडपडतात. त्यांच्या मनातला कुतुहलाचा झरा सतत खळखळत वाहत असतो आणि तो त्यांच्यासोबत त्यांच्या आसपासच्या मित्रमंडळींनाही समृद्ध करत असतो.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content