अनसीन - द ट्रूथ अबाउट इंडियाज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स

अनसीन - द ट्रूथ अबाउट इंडियाज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स
लेखक - भाषा सिंग

अनसीन - द ट्रूथ अबाउट इंडियाज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स

हे दिल्लीस्थित पत्रकार भाषा सिंग यांचं २०१२ मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक. रीणू तलवार यांनी या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.
भारतात आजही मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग, म्हणजे माणसांनी स्वतःच्या हातांनी मैला साफ करण्याची, तो डोक्यावरून वाहून नेण्याची अमानुष पद्धत सुरू आहे. पाण्याची व्यवस्था नसलेले कोरडे संडास आजही ग्रामीण भागात आणि काही प्रमाणात शहरांतही आहेत, याची आपल्याला माहितीही नाही. तर तिथला मैला उचलण्याचं काम कोण करतं, ते काम त्यांना का करावं लागतं, त्याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, याची जाणीव आपल्याला कुठून असणार? असं हे पूर्ण अज्ञात जग भाषा सिंग यांनी या पुस्तकातून समोर आणलं आहे.
मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हे भारतातल्या जातिव्यवस्थेचं कदाचित सर्वात घृणास्पद वास्तव असेल. काश्मीर, दिल्ली बिहार, प. बंगाल, हरियाणा, गुजराथ, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधल्या मैलासफाई करणा-या कर्मचा-यांशी बोलून भारताचा मध्यमवर्गीयांना पूर्ण अज्ञात असणारा चेहरा भाषा सिंग यांनी समोर आणला आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेला मैलाही हाताने साफ केला जातो. त्या कर्मचा-यांच्या व्यथा-वेदनाही सिंग यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत.
सिंग यांनी प्रामुख्याने लिहिलं आहे ते मैला साफ करणा-या बायकांबद्दल. या बायकांसोबत त्याच्या कामाच्या ठिकाणी फिरून, त्यांच्या कामाचं स्वरूप समजून घेऊन, त्यांच्याशी दीर्घ चर्चा करून हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. काश्मीरपासून कर्नाटकपर्यंत सर्वत्र काही विशिष्ट जातींना मैला साफ करण्याचं अन्यायकारक काम आजही करावं लागतं आहे. त्या कामाबद्दल या महिला काय विचार करतात, हे काम एका पढीकडून दुस-या पिढीकडेही जाते का, शिक्षण घेतलेली पुढची पिढी या कामाकडे कसं बघते, या कामाचा महिलांच्या तब्येतीवर काय परिणाम होतो असे अनेक मुद्दे धुंडाळण्याचा प्रयत्न भाषा सिंग यांनी या पुस्तकातून केला आहे. जातिव्यवस्थेने एका विशिष्ट समाजावर लादलेलं हे काम झुगारून देण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होतो आहे. विविध संस्था-संघटना त्यांच्या पाठिशी उभ्या आहेत. या प्रयत्नांबद्दलही सिंग यांनी पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. आजच्या भारताचं एक दयनीय रूप समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणं अत्यावश्यक आहे.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content