आसपासच्या नोंदी

आपल्या आसपास अनेक घडामोडी घडताहेत. तंत्रज्ञान आणि माध्यमांमुळे आपलं जगणं हळूहळू बदलतंय. पण त्याची नोंद आपण घेतोय का? हे बदल समजून घेण्याचा अवधूत डोंगरे यांनी केलेला हा एक ललित प्रयत्न.

ब्लॉग विश्व

ब्लॉग हे अभिव्यक्तीचं नवं व्यासपीठ. त्याद्वारे अनेक मराठी मंडळी भरभरून लिखाण करत आहेत. इंटरनेटच्या साहित्यविश्वात सक्रिय असणा-या आमच्या सहकारी प्रीति छत्रे यांनी चौथ्या ई-संमेलनासाठी दहा ब्लॉग्जची शिफारस केली आहे, त्यांच्या या लिंक्स.

अध्यक्षीय

चौथ्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी व्यक्त केलेले विचार.

See video

विचारांशी बांधिलकी ठेवून गंभीरपणाने संमेलनं हवीत, हीच समाजाची अपेक्षा आहे. उत्सव जरूर हवा, पण या परिस्थितीच्या परिवर्तनाचं त्यांचं साहित्य, भाषा, बोलीभाषा, त्यात भाषेचा सकसपणा, पोत व वृद्धी असं सगळंच आज हवं. जमिनीतील पाणी, जमिनीतील सत्त्वं आणि जमिनीतील जी काही शक्ती असेल ती घेऊन, पिऊन जमिनीतून भक्कम व सुंदर अशी पीकसृष्टी-वनश्री उभी राहते, नव्याने वाढतच जाते, वृद्धिंगत होत असते, तसंच साहित्य, त्यातले अनुभव हे भाषा एकसंध, जिवंत होऊन आले पाहिजेत. मराठी मनाचा, भाषेचा, बोलीभाषेचा व बदलत्या जीवनाचा तळ संपूर्ण ढवळून या कृषिसंस्कृतीसारखीच मराठी समृद्ध होईल- उत्कर्ष पावेल...

महानोर जेव्हा स्वतःच्या कविता गातात...

मी आणि माझ्या माझ्या कविता

मराठी साहित्यविश्वातील काही ज्येष्ठ कवींनी आपल्या कवितेबद्दल व्यक्त केलेले विचार

ना. धो. महानोर - हिरव्या बोलीचा शब्द

गोष्ट खास पुस्तकाची

लेखकाला एखादं पुस्तक कसं सुचलं, पुस्तकाचं स्वागत कसं झालं, उलटसुलट चर्चा झाल्या का, त्या पुस्तकाचा सामाजिक विचार-व्यवहारांवर काही परिणाम झाला का असे प्रश्न वाचकाच्या मनात तरळत असतात. म्हणूनच आपल्याला स्वत:चं जे पुस्तक महत्त्वाचं वाटतं त्या पुस्तकावर लिहावं, असं आवाहन आम्ही मराठीतील नामवंत आणि प्रतिभावंत लेखकांना केलं. त्या लेखमालेतले हे काही लेख.

विशेष मुलाखत

माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना खास ई-संमेलनानिमित्त बोलतं केलंय मनोहर सोनवणे आणि महेंद्र मुंजाळ यांनी

अलीकडची पुस्तकं

साहित्यिक दस्तावेज 14

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग दुसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

पुस्तक प्रदर्शन - एक चळवळ 14

ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून आज अनेक ग्रंथप्रदर्शक मराठी वाचनसंस्कृतीच्या वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. खास ई-साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोप-यात कार्यरत असलेल्या काही मंडळींचे अनुभव महेंद्र मुंजाळ आणि स्वप्नाली अभंग यांनी शब्दबद्ध केले आहेत..

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

ई-संमेलनाचं हे पाचवं वर्ष. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत समाजातल्या शोषित-वंचितांच जगणं खास रिपोर्ताज शैलीत मांडणारे लेखक अनिल अवचट.
विचारांचं आदानप्रदान हा इतर कोणत्याही संमेलनाप्रमाणेच या ई-साहित्य संमेलनाचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी वेब माध्यम कोणकोणत्या पद्धतीने वापरता येईल याचे प्रयोग आम्ही गेली चार वर्षं ई-संमेलनातून करत आहोत.
पुढे वाचा

samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content