राजकीय

धक्कादायक आणि धोकादायक - सुहास कुलकर्णी

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत ७ जून रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.

bjp rijiju naqvi

गेल्या आठवड्यात मोदी सरकारमधील दोन मंत्र्यांनी हद्दच केली. एरवी विरोधकांवर तुटून पडणारे भाजपचे नेते आपापसातच भिडले. निमित्त घडलं, गोवंशहत्या बंदीच्या अनुषंगाने देशात जो विरोधी सूर निघत आहे, त्यावर प्रहार करण्याचं. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे एक ‘टाळ्यामिळवू’ विधानं करणारे नेते आहेत. ‘राजापेक्षा राजनिष्ठ’ अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे भाजप किंवा संघ परिवारातील अस्सल गोरक्षकाला जे सुचणार नाही, ते नक्वी लीलया बोलून दाखवतात.

संकटसमयी निर्नायकी

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत २४ मे रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.

‘गेल्या वर्षभरात आपल्या सरकारवरील जनतेचा विश्वास आणखी वाढला आहे’, अशा आशयाचं विधान नरेंद्र मोदींनी नुकतंच परदेश दौर्‍यात केलं. हा दावा काही घटकांबाबत खरा असला तरी देशातील एक मोठा समाजघटक मोदी सरकारने उचललेल्या पावलांमुळे नाराज आहे. सर्व विरोधी पक्षांचा विरोध असूनही मोदी सरकारने ज्या रीतीने भूमीअधिग्रहणाविषयीचा अध्यादेश आणला, त्यावरून देशभरातील शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे प्रचार काळात शेतकर्‍यांसाठी एक ना अनेक वायदे केलेल्या मोदींबाबत विश्वासाचं सोडा, भ्रमनिरासाचंच वातावरण अधिक आहे.

सेनापती; पण रुतलेल्या पक्षांचे - सुहास कुलकर्णी

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत १० मे रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.

Ukal Bukal - 10 May

पक्ष सुदृढ अवस्थेत असोत किंवा दुर्बळ अवस्थेत; प्रत्येक पक्षासमोर प्रश्न असतातच. पण मुद्दा असा आहे की, आपापल्या पक्षाच्या प्रश्नांकडे पाहण्याची आणि त्यावर मार्ग काढण्याची शक्ती, क्षमता आणि इच्छा महाराष्ट्रातल्या त्या त्या पक्षांच्या नेत्यांकडे आहे का?

इरादा आणि मर्यादा - सुहास कुलकर्णी

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.

येचुरींना स्वतःच्या मनातला इरादा प्रत्यक्षात आणायचा असेल, तर फक्त संघटनात्मकच नव्हे, तर वैचारिक मर्यादाही जाणून घ्याव्या लागतील आणि ओलांडाव्या लागतील. अन्यथा मुठी आवळून दिलेले ‘इन्किलाब झिंदाबाद’चे नारे हवेत विरून जायला वेळ लागणार नाही.

बिनबेरजेचं गणित - सुहास कुलकर्णी

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.

Ukal Bukal 7 Apr-2.png

इशारे आणि हाकारे - सुहास कुलकर्णी

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत २९ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.

महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रचंड पोकळी तयार झालेली आहे. या प्रचंड पोकळीत शिवसेनेला स्वतःची जागा पक्की करायची आणि विस्तारण्याची मोठी संधी होती. अजूनही आहे. पण ही संधी साधायची तर निव्वळ इशारे देऊन भागणार नाही; हाकारेही द्यावे लागतील.

राष्ट्रभक्तीच्या नावानं - सुहास कुलकर्णी

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत १५ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.

Masarat Alam.jpg

फुटीर म्हणून ज्ञात असलेला हुरियत कॉन्फरन्सचा नेता मसर्रत आलम याला कारागृहातून सोडण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी घेतल्यानंतर देशभर गदारोळ उठला. ‘केंद्राला न विचारता इतका महत्त्वाचा निर्णय कसा होऊ शकतो आणि झाला असल्यास एक तर भाजपने जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडावं किंवा राज्य सरकार बरखास्त करून तिथे नव्याने निवडणुका घ्याव्यात’, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली.

प्रबोधन परंपरेची पीछेहाट - सुहास कुलकर्णी

(दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत १ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.)


दाभोलकर असोत अथवा पानसरे, हे दोघंही प्रामुख्याने सामाजिक मुद्द्यांच्या अनुषंगाने समाजाचं प्रबोधन करू पाहत होते. मात्र, प्रबोधनाला राजकीय शक्तीचं पाठबळ अनिवार्य झाल्यामुळे निव्वळ प्रबोधन आणि समाजसुधारणेचा आग्रह टिकू शकत नाही. तसा प्रयत्न कुणी केलाच तर त्याचा दाभोलकर-पानसरे होतो, ही गोष्ट स्पष्ट झाली आहेच.

‘आप’के साइड इफेक्ट्स - सुहास कुलकर्णी

(दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू आहे. या सदराअंतर्गत १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.)


प्रत्येक निवडणुकीचा निकाल काही एक संदेश देत असतो. निवडणूक जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या पक्षांना हा संदेश समजून घ्यावा लागतो. जे पक्ष संदेशाच नेमकं वाचन करू शकतात, ते पुढे जातात. जे पक्ष डोळ्यावर कातडं ओढून घेत आहेत, त्यांना लोक झटके देत राहतात. याचा अर्थ, कोणत्याही लोकशाही देशामध्ये मतदारांची समूहशक्ती जो निर्णय घेत असते, त्यातून आगामी राजकारण आणि येणारा काळ आकार घेत असतो. दिल्लीच्या निवडणूक निकालातून असा कोणता संदेश दिला गेला आहे?

काँग्रेस विरुद्ध काँग्रेस - सुहास कुलकर्णी

(दैनिक ‘दिव्य मराठी’च्या रविवार पुरवणीमध्ये सुहास कुलकर्णी यांचे उकल-बुकल हे सदर सुरू झाले आहे. या सदराअंतर्गत १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख.)

राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यावरून येत्या महिन्या-दोन महिन्यांत घमासान होईल आणि पक्षातच जुने काँग्रेसवाले आणि नवे काँग्रेसवाले यांच्यात तुंबळ लढाई होईल, असं मानलं जात आहे. प्रत्यक्षात, पक्षांतर्गत घमासान होण्याइतपत तरी या पक्षात बळ उरलं आहे का, हा प्रश्न आहेच.

Syndicate content