सामाजिक संशोधन

आनंदवन प्रयोगवन

पुस्तकासंबंधी माहिती
आनंदवन प्रयोगवन - डॉ. विकास आमटे
लेखक: 
डॉ. विकास आमटे
संपादक: 
शब्दांकन – गौरी कानेटकर
पृष्ठसंख्या: 
१९२
पहिली आवृत्ती: 
२६ डिसेंबर २०१४
मुखपृष्ठ: 
श्याम देशपांडे
संक्षिप्त परिचय: 
अपार कष्ट आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर बाबा आमटे यांचं मानवमुक्तीचं स्वप्न साकारणाऱ्या ध्येयवेड्यांची गोष्ट.

बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे.

शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.

आज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याहीपलीकडे गावाखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरणही आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाऱ्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे.

शेतकरी जेव्हा जागा होतो

पुस्तकासंबंधी माहिती
शेतकरी जेव्हा जागा होतो
लेखक: 
अभिमन्यू सूर्यवंशी
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
११२
पहिली आवृत्ती: 
३ ऑगस्ट २०१४
मुखपृष्ठ: 
दीपक संकपाळ
संक्षिप्त परिचय: 
या पुस्तकाचा नायक आहे पुंजाबाबा गोवर्धने. स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या भात उत्पादक शेतक-यांच्या लढ्याचा सेनापती. पुंजाबाबांचं हे चरित्र वाचत असताना मला अनेकदा असं वाटून गेलं की पुंजाबाबांचं नेतृत्त्व माझ्यापेक्षाही अधिक गुणवत्तापूर्ण आणि कष्टाळू होतं. पुंजाबाबांची पार्श्वभूमी अशिक्षित शेतक-याची होती, तरीही त्यांनी विचाराची मोठी झेप घेतली आणि अलौकिक कार्य करून ठेवलं. पुंजाबाबांचं हे चरित्र म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या एका पर्वाचा इतिहासच आहे. <strong>~शरद जोशी संस्थापक, शेतकरी संघटना</strong>

एक आझाद इसम

पुस्तकासंबंधी माहिती
एक आझाद इसम - अमन सेठी, अनुवाद - अवधूत डोंगरे
लेखक: 
अमन सेठी, अनुवाद - अवधूत डोंगरे
पृष्ठसंख्या: 
१९०
पहिली आवृत्ती: 
१ मे २०१४
मुखपृष्ठ: 
दीपक संकपाळ
संक्षिप्त परिचय: 
दिल्ली. देशाच्या राजधानीचं आणि सत्तेची मिजास मिरवणारं एक शहर. दिल्लीची ही ओळख सर्वदूर पसरलेली आहे. परंतु याच दिल्लीच्या पोटात गरिबांचं, कष्टकऱ्यांचं, हातावर पोट असणाऱ्यांचं एक प्रचंड मोठं जग कुणाच्या खिसगणतीतही नाही. घर-दार-संसार काहीच नसणारी, रक्ताच्या नात्यातलंही कुणी नसणारी, फुटपाथवरच आयुष्य काढणारी एकाकी, लावरिस आणि अनोळखी माणसं इथे जगतात, कष्टतात आणि मरूनही जातात. स्वतःची कोणतीही नोंद न ठेवता. अशा माणसांमध्ये वावरून, त्यांच्याशी दोस्ती करून, त्यांच्यातलंच बनून त्यांचं असुरक्षित, भिरकावलेलं, भेसूर, विदारक जगणं समोर आणणारं हे पुस्तक. धक्कादायक आणि वाचकाला घुसळून टाकणारं. आपला देश, आपला समाज यांच्याबद्दलच्या आपल्या समजांना मुळापासून हादरवून टाकणारं.

रानबखर

पुस्तकासंबंधी माहिती
रानबखर
लेखक: 
मिलिंद थत्ते
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
९६
पहिली आवृत्ती: 
१ जानेवारी २०१४
मुखपृष्ठ: 
गिरीश सहस्रबुद्धे
संक्षिप्त परिचय: 
आदिवासी म्हणजे रानातले राजे आशीच आजवरची रूढ प्रतिमा. पण गेल्या पंचवीस - तीस वर्षात आदिवासींच्या जगण्याचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. त्यात कुपोषणापासून विस्थापनापर्यंत आणि स्वशासनापासून ते नक्षलवादापर्यंत अनेक बाबी आहेत. मग आदिवासींच हे आजचं जगणं कसं आहे?त्यांचे खरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या कष्टमय जगण्याचा फास सुटावा, यासाठी काय प्रयत्न चालले आहेत? मायबाप सरकारच्या धोरणामुळे त्यांच्या जगण्यावर काय परिणाम होतो आहे? गेली दहा बारा वर्ष नाशिक-ठाणे-नंदुरबार या पट्ट्यातील आदिवासींसोबत त्यांच्यातलाच एक बनून राहिलेल्या आणि त्यांच्याच नजरेतून त्यांची सुख-दु:खं बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितलेली हि रानबखर
Syndicate content