कार्यकर्तृत्वपर

शोधा खोदा लिहा

पुस्तकासंबंधी माहिती
शोधा खोदा लिहा
लेखक: 
संपादक : सुहास कुलकर्णी
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
२४८
पहिली आवृत्ती: 
२६ जानेवारी २०१७
मुखपृष्ठ: 
चंद्रमोहन कुलकर्णी
संक्षिप्त परिचय: 
१९९० ते २०१५ हा पंचवीस वर्षांचा काळ विलक्षण घडामोडींनी भारलेला आहे. जागतिकीकरण, जातीय अस्मिता अन् धार्मिक अभिमान या तीन प्रक्रिया या काळात उलगडल्या. त्याशिवाय गरिबांच्या-वंचितांच्या समस्या, शेतकरी-कामगारांची दुरवस्था, रुढी-परंपरांचा पगडा, स्त्रियांचं दुय्यमत्व, शहरीकरण आणि सर्व स्तरावरील सरकारी अनास्था अशा अनेक प्रश्‍नांनी आपलं जीवन घेरलेलं आहे. समाजाला सतावणारे असे प्रश्‍न समजून घेणं हे ‘युनिक फीचर्स’ने सुरुवातीपासून आपलं काम मानलं. त्यासाठी त्यांचे पत्रकार गटागटाने गावाखेड्यात गेले, वस्त्याझोपड्यांत वावरले, रानावनात फिरले. समाजात जाऊन शोधाशोध केली, प्रचंड लेख लिहिले, दृष्टीआडचे प्रश्‍न वाचकांसमोर आणले. अशा अनेक लेखांपैकी निवडक महत्त्वाच्या आणि संस्मरणीय लेखांचा हा दस्तावेज. समाजाच्या गेल्या पाव शतकाचं आत्मवृत्त सांगणारा.

आमचा पत्रकारी खटाटोप

पुस्तकासंबंधी माहिती
आमचा पत्रकारी खटाटोप
लेखक: 
सुहास कुलकर्णी
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
१९२
पहिली आवृत्ती: 
२६ जानेवारी २०१७
मुखपृष्ठ: 
चंद्रमोहन कुलकर्णी
संक्षिप्त परिचय: 
‘युनिक फीचर्स’ हे नाव वाचत्या महाराष्ट्राला परिचित आहे. एकाच वेळेस वीस-पंचवीस छोट्या-मोठ्या दैनिकांसोबत काम करणारी फीचर्स सर्व्हिस ही या संस्थेची पहिली ओळख. महत्त्वाच्या सामाजिक प्रश्‍नांप्रमाणेच दुर्लक्षित आणि दृष्टिआड झालेल्या विषयांवर केलेलं चौफेर लेखन हे या संस्थेचं वैशिष्ट्य. ‘युनिक फीचर्स’ने महाराष्ट्रातील दैनिकं, साप्ताहिकं, दिवाळी अंक, टीव्ही चॅनल्स, वेबसाइट्स, पुस्तकं अशा सर्व मेनस्ट्रीम माध्यमांतून समाजभान जागं ठेवण्याचं काम केलंच, शिवाय जागत्या वाचकांसाठी हक्काची व्यासपीठंही उभी केली. स्वतःचं मासिक सुरू केलं. स्वतःचे दिवाळी अंक सुरू केले. स्वतःची प्रकाशन संस्था काढत पुस्तकांमधूनही सामाजिक पत्रकारिता करता येऊ शकते हे दाखवून दिलं. पत्रकारितेत स्वतःची वाट चोखाळणार्‍या तरुणांच्या एकत्रित धडपडीतून उभ्या राहिलेल्या एका यशस्वी प्रयोगाची ही गोष्ट. पंचवीस वर्षांच्या पहिल्या टप्प्यातला खटाटोप उलगडून दाखवणारी.

विधिमंडळातून

पुस्तकासंबंधी माहिती
विधिमंडळातून
लेखक: 
ना. धों. महानोर
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
१९२
पहिली आवृत्ती: 
१६ सप्टेंबर २०१७
मुखपृष्ठ: 
संदीप साळुंके
संक्षिप्त परिचय: 
राज्यपालांचे नामनियुक्त सदस्य म्हणून दोन वेळा विधान परिषदेवर काम केलेल्या महानोरांनी शेती-पाण्याशी संबंधित अनेक ज्वलंत विषय ऐरणीवर आणले. विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांची हलाखी संपावी यासाठी सरकारला कित्येक योजना सुचवल्या; कित्येक मंजूर करून घेतल्या. दुसरीकडे, महाराष्ट्राचं साहित्य-कलासंपन्न रुप टिकून राहावं यासाठी अखंड धडपड केली. एकूण समाजाचं सांस्कृतिक भरण-पोषण व्हावं, यासाठी अनेक नवनूतन कल्पना मांडल्या आणि सरकारकडून प्रत्यक्षात आणवून घेतल्या. ना. धों. महानोरांनी आमदार म्हणून विधान परिषदेत केलेल्या भाषणांचा हा संपादित दस्तावेज.

लाकूड कोरताना

पुस्तकासंबंधी माहिती
लाकूड कोरताना
लेखक: 
अनिल अवचट
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
१०३
पहिली आवृत्ती: 
२६ ऑगस्ट २०१५
मुखपृष्ठ: 
प्रणव संत
संक्षिप्त परिचय: 
माझा स्वभाव नादिष्टच. अनेक गोष्टी करून पहायचा नाद. त्यात लाकूड हाती लागलं आणि कोरत बसलो, ते आजपावेतो. हत्यार कसं धरायचं तेही सुरुवातीला माहीत नव्हतं. त्यामुळे भरपूर चुका केल्या. हाताला, मांडीला जखमा झाल्या. कधी हत्याराला हातोडीचा ठोका जरा जोरात बसला; लाकूड चिरफाळत गेलं. केलेलं काम वाया गेलं; पण त्यातून लाकडाचा स्वभाव कळला. आपलं आपण शिकत गेलो. हळूहळू लाकडातून शिल्पं आकारत गेली. तुम्हाला सांगतो, शिल्प पुरं झाल्यावर काय बरं वाटतं! शिखरावर पोहचल्यावर थकवा घालवणारा वार्‍याचा थंडगार झोत यावा तसं. कोणालाही हा आनंद घेणं शक्य आहे, कुणी शिकवायला असो किंवा नसो... - अनिल अवचट

एव्हरेस्ट - गोष्ट एका ध्यासाची

पुस्तकासंबंधी माहिती
एव्हरेस्ट - गोष्ट एका ध्यासाची
लेखक: 
उमेश झिरपे
संपादक: 
संहिता - गौरी कानेटकर, शब्दांकन - मुक्ता चैतन्य
पृष्ठसंख्या: 
१९२
पहिली आवृत्ती: 
४ ऑक्टोबर २०१४
मुखपृष्ठ: 
श्याम देशपांडे
संक्षिप्त परिचय: 
भारतातील सर्वांत मोठ्या आणि विक्रमी नागरी मोहिमेचा थरार

जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट. विशाल हिमतीची माणसं या शिखराला गवसणी घालत असतात. आपल्या मराठी मातीतही असे एव्हरेस्टवीर आहेतच. पण पुण्यातल्या `गिरिप्रेमी` या संस्थेतर्फे एक-दोन नव्हे, तर तब्बल तेरा गिर्यारोहकांची महत्त्वाकांक्षी मोहीम काढली गेली. हजारो लोकांच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम अभूतपूर्व ठरली.
एव्हरेस्टचं आव्हान माणसाच्या सर्वोच्च क्षमतांची परीक्षा घेणारं असतं. शरीर आणि मन यांना अपार टणक बनवलं, तरच हिमालयातील सर्वस्वी विपरीत वातावरणात टिकाव लागू शकतो. एव्हरेस्ट गाठता येऊ शकतं.

Learning to live again

पुस्तकासंबंधी माहिती
Learning to live again
लेखक: 
Anil Awachat
संपादक: 
Translation - Sumedha Raikar-Mhatre
पृष्ठसंख्या: 
192
पहिली आवृत्ती: 
26 January 2012
मुखपृष्ठ: 
Subhash Awachat
संक्षिप्त परिचय: 
Muktangan- story of a de-addiction centre.

This book is a story of Muktangan, narrated by its founder Anil Awachat. The writer is a popular Marathi author, a recipient of several literary honors, including the Sahitya Akademi Award.

Pathways to LIGHT

पुस्तकासंबंधी माहिती
Pathways to LIGHT
लेखक: 
Dr. Prakash Amte
संपादक: 
Vilas Salunke, Translation- Chandrashekhar Marathe
पृष्ठसंख्या: 
182
पहिली आवृत्ती: 
1 January 2012
मुखपृष्ठ: 
Shyam Deshpande
संक्षिप्त परिचय: 
An autobiography of a Magsaysay Awardee

Baba wished to bring the tribal people into the mainstream, stop them from being exploited and give them an opportunity to live as human beings. I took the responsibility and we worked hard to achieve what he had visualised. The work reached its present landmark only through Baba`s trust in me, Tai`s affection for me and Manda`s strong support..
This is the story of how Baba`s dream was realized in Hemalkasa. In a way, its also the story of my life.
- Dr. Prakash Amte.

कुण्या एकाची धरणगाथा

पुस्तकासंबंधी माहिती
कुण्या एकाची धरणगाथा
लेखक: 
अभिमन्यू सूर्यवंशी
संपादक: 
डॉ. सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
११५
मुखपृष्ठ: 
श्याम देशपांडे
संक्षिप्त परिचय: 
एका शेतक-याने धरणासाठी दिलेल्या यशस्वी झुंजीची अज्ञात कहाणी...

नाशिक जिल्ह्यातला बागलाण तालुक्याचा परिसर हा वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेला भाग. इथल्याच गोपाळ मोरे नावाच्या गरीब शेतक-याने हा भाग पाण्यात भिजवण्याची इच्छा मनात धरली आणि तिचा चिवट वृत्तीने पाठपुरावाही केला. या इच्छेपोटी आमदारापासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचा पिच्छा पुरवला...आणि शेवटी आपल्या दुर्दम्य आकांक्षा आणि परिश्रमांनी धरण मिळवलंच.

त्याची ही गोष्ट..इतिहासातले तुटक धागेदोरे जुळवत पन्नास वर्षांच्या अज्ञातवासातून बाहेर काढलेली...

जग बदल घालुनि घाव

पुस्तकासंबंधी माहिती
जग बदल घालुनि घाव
लेखक: 
एकनाथ आवाड, शब्दांकन - प्रशांत खुंटे
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
२१२
पहिली आवृत्ती: 
१ मे २०११
ताजी आवृत्ती: 
दुसरी
मुखपृष्ठ: 
चंद्रमोहन कुलकर्णी
संक्षिप्त परिचय: 
जातीय दुःखावर उत्तरे शोधता शोधता स्वतःसोबत हजारो दलितांच्या जीवनात सन्मानाची ज्योत पेटवणा-या एकनाथ आवाड यांचे दलित साहित्याच्या प्रवाहात एक पाऊल पुढे टाकणारे आत्मकथन.

एखाद्या गरीब पोतराजाच्या पोराकडून कुणाच्या काय अपेक्षा असणार? बापासारखं पोतराज व्हावं किंवा जातीची पारंपरिक कामं करत लाचारीनं जगत रहावं.

पण एकनाथ आवाड यांनी ही मळलेली वाट धुडकावली.
घर सोडलं, गाव सोडलं, कष्ट करत शिक्षण घेतलं.
जगण्याशी लढत आपली वाट आपण शोधली.

पण स्वतःच्या सुखात समाधान मानलं नाही.
आदिवासी नि दलितांना वेठबिगारीतून बाहेर काढलं.
अस्पृश्यता आणि जातीभेद या विरोधात गावोगाव संघर्ष मांडला.
हजारो भूमिहीनांना गायरान जमिनी मिळवून दिल्या.
त्यांना सेंद्रीय शेती शिकवली. बचत करून छोटे मोठे व्यवसाय करण्याचा मंत्र दिला.
अन्यायावर घाला घालत नवं जग घडवण्याचा नवा पॅटर्न उभा केला.

खरेखुरे आयडॉल्स - भाग २

पुस्तकासंबंधी माहिती
खरेखुरे आयडॉल्स - भाग २
लेखक: 
युनिक फीचर्स
संपादक: 
सुहास कुलकर्णी
पृष्ठसंख्या: 
२२४
पहिली आवृत्ती: 
ऑगस्ट २०१०
ताजी आवृत्ती: 
चौथी
मुखपृष्ठ: 
श्याम देशपांडे
संक्षिप्त परिचय: 
समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या ख-याखु-या आयडॉल्सना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शेती-पाणी-शिक्षण-आरोग्-र्पावरण-ग्रामविकास-विज्ञान-तंत्रज्ञान आदि क्षेत्रात पथदर्शक कार्य उभारणा-या आणखी काही कार्यरतांची ओळख करून देणारं पुस्तक.

या पुस्तकात समाविष्ट केलेल्या सर्व आयडॉल्सचं एक समान वैशिष्ट्य म्हणजे त्यांची समाजाप्रतीची निष्ठा, बांधिलकी. यातली काही मंडळी स्वयंस्फूर्तीने काम करणारी आहेत, तर काही स्वत:च्या स्वयंसेवी संस्था-संघटना स्थापन करून त्यामार्फत कार्यरत आहेत. काही मंडळी रचनात्मक - संस्थात्मक-सेवाभावी कामात आहेत, तर काही संघर्षात्मक- आंदोलनात्मक मार्ग पकडून पुढे सरकत आहेत. काही मंडळी शासकीय सेवेत छोट्या मोठ्या पदांवर काम करत आहेत. कुणी राजकारणात आहेत, तर कुणी विज्ञानक्षेत्रात.

Syndicate content