अवचट लेख

माणसं : मला (आणि वाचकांनाही) जागं केलेलं पुस्तक

अनिल अवचट त्यांच्या माणसं या पुस्तकाबद्दल

‘माणसं’! या पुस्तकावर माझा विशेष जीव आहे. या पुस्तकाने मला खूप काही दिलं. हे पुस्तक इतकं वाचलं जाईल असं मला वाटलं नव्हतं. या पुस्तकातील लेख मौज दिवाळी अंकातून (एक अपवाद : ‘अंधेरनगरी निपाणी’ या लेखाचा. तो ‘पुरोगामी सत्यशोधक’मधे आलेला.) प्रसिद्ध झाले होते. ते त्या त्या वेळी वाचकांनी वाचले असणारच. मग आता ते पुस्तक कशाला घेतील, असं मला वाटत असे. एक दिवस कोल्हापूरचे माझे ज्येष्ठ, पितृतुल्य स्नेही बापूसाहेब पाटलांचा फोन आला. ते आणि लीलाताई दोघंही काश्मीर ट्रिपला जाऊन आले होते. त्यांनी बरोबर हे एकच पुस्तक नेलं होतं. ते आल्या आल्या फोनवर पुस्तकाविषयी इतके भरभरून बोलले की बस! जीव भांड्यात पडला.

घुसळण कट्टा

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

Syndicate content