परिवर्तन

प्रयत्न छोटे पण आशादायी - कौस्तुभ आमटे

बीड, यवतमाळ आणि सातारा-सांगलीतील मागास भागांमध्ये ‘आनंदवन समाजभान अभियाना’मार्फत शेती-पाणी-रोजगार निर्मिती याबाबतीत काम सुरू आहे. समाजभान अभियानामार्फत केलेल्या छोट्या हस्तक्षेपांमुळे होऊ घातलेल्या छोट्या; पण आशादायी बदलांच्या या नोंदी.

छोटंसं उत्तर डोंगराएवढ्या प्रश्नावर - कौस्तुभ आमटे

पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात शेती-माती वाहून जाण्याची समस्या महाराष्ट्रातील सर्वच डोंगरउतारावरील गावांना भेडसावत असते. यवतमाळमधील अशाच एका गावात एक छोटं उत्तर शोधलं गेलं. कसं?

करंजी : पाण्याचं काम लई ब्येस - कौस्तुभ आमटे

पाऊस झाला की दुष्काळाची चर्चा मागे पडेल ती थेट पुढच्या वर्षी पुन्हा पाणीटंचाई भेडसावू लागेपर्यंत. हे दुष्टचक्र भेदायचं असेल तर त्यासाठी पाणी साठवण्याचे-जिरवण्याचे शास्त्रीय उपाय योजावे लागतील. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातल्या एका टापूमध्ये समाजभान अभियानाच्या माध्यमातून असं काम यंदाच्या उन्हाळ्यात उभं राहिलं आहे.

एका स्वप्नाची पायाभरणी - कौस्तुभ आमटे

आनंदवन समाजभान अभियानामार्फत बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातले ४४ तरुण-तरुणी मे महिन्यात आनंदवनात विविध उद्योगांच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. प्रशिक्षणानंतर या मंडळींनी आपापल्या गावांमध्ये स्वयंरोजगार सुरू करावा आणि आपल्याबरोबर गावातल्या इतरांनाही विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घ्यावं, असं स्वप्न आहे. प्रशिक्षणाचा हा पहिला टप्पा म्हणजे त्या स्वप्नाची पायाभरणीच.

उद्यमशीलतेच्या रुजवातीचा ‘झरी’ प्रयोग - कौस्तुभ आमटे

शेती, पाणी, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांभोवती ‘आनंदवन समाजभान अभियान’ काम करू पाहतं आहे. या कामातला पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यात उलगडू लागला आहे.
त्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नाबद्दल...

आनंदवन : प्रयोगवन

आनंदवन म्हणजे कुष्ठरुग्ण, एवढीच आपली समजूत; पण आनंदवनाच्या कामाचा आवाका त्याहून बराच अधिक आहे. बाबा आमटे यांच्या कुष्ठरुग्ण आणि अपंग पुनर्वसनाच्या कामाला डॉ. विकास आमटे यांनी नव्या प्रयोगांची जोड दिली. सामाजिक प्रश्नक सोडवणारी प्रयोगशाळा म्हणून असलेली या प्रकल्पाची ओळख आता त्यानंतरची पिढीही आणखी पक्की करू पाहते आहे. दुसरीकडे, आनंदवनाच्या साथीने वाढलेल्या हेमलकशातील लोकबिरादरी प्रकल्पातही डॉ. प्रकाश आमटे यांच्यानंतरची नवी पिढी आव्हानांना भिडली आहे. बाबा आमटे यांच्या स्वप्नांना नवा आयाम देणार्या या पिढीची बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त करून दिलेली ओळख.

आनंदवनामध्ये बाबा आमटे यांची नातसून पल्लवी आमटे सध्या एका वेगळ्या प्रयोगामध्ये गढलेली आहे. ती ग्रामीण महिलांसाठी कमी खर्चात तयार होतील आणि स्वच्छ धुतले जातील असे कॉटनचे सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्याच्या खटपटीत आहे. या संदर्भात जगभरात चाललेले प्रयोग ती अभ्यासते आहे, आपल्या परिस्थितीशी त्यातलं काय जुळू शकेल याची चाचपणी करते आहे. नॅपकिनचं एखादं सँपल तयार करून त्याची उपयुक्तता, व्यवहार्यता अजमावून त्यात पुन:पुन्हा सुधारणा करते आहे.

Syndicate content