धर्म/श्रद्धा

निमित्त झाकीर नाईक - हिनाकौसर खान पिंजार

बांगलादेशमधील दहशतवाद्यांपैकी एकाने मुंबईच्या डॉ. झाकीर नाईक यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या नावाभोवती संशयाचं जाळं निर्माण झालं. नाईकांच्या विरोधात मुस्लिमांमधूनही मतं व्यक्त झाली. पण तरीही बहुसंख्य मुस्लिमांमध्ये त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, असं दिसून येतंय. त्यामागची कारणं काय? मुस्लिम समाज नेमका कसा विचार करतो याची स्पष्टता येण्यासाठी आम्ही तरुण मुला-मुलींशी संवाद साधला. तो असा.

शिंगणापूरातले जलिकट्टू - राजेश्वरी देशपांडे

गेल्या पाच-दहा वर्षात भारतातलं समाजजीवन झपाट्याने बदलत आहे. त्याचे पडसाद इथल्या सांस्कृतिक व्यवहारांवरही पडत आहेत. एकात एक गुंतलेल्या अशा अनेक घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भारतातल्या बदलत जाणार्‍या सार्वजनिक चर्चाविश्‍वाचा धांडोळा घेण्याचा हा एक प्रयत्न.

मॅनेजमेंटचा महाकुंभ - दीप्ती राऊत

सिंहस्थ असो किंवा पंढरीची वारी, लाखो भाविक एकत्र येतात. भाविकांच्या श्रद्धेचा भाग असलेले हे कार्यक्रम मॅनेजमेंटचा कस पाहतात. ते सुरळीतपणे पार पाडावेत यासाठी अनेक यंत्रणा पणाला लागलेल्या असतात. पुढच्या महिन्यात नाशिकमध्ये भरणार्‍या कुंभमेळ्यातील मॅनेजमेंटच्या आव्हानांचा हा वेध...

Deepti Raut lekh photo 1नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याकडे संपूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष लागलंय. कुंभमेळ्यात येणारे लाखो भाविक, साधू-महंतांचं मानपान, कुंभमेळ्याची धार्मिक-सांस्कृतिक उपयुक्तता, पवित्र स्नान, नदीचं प्रदूषण आणि अर्थातच या सगळ्याचं राजकारण अशा अनेक चर्चांनी सध्या नाशिक गाजतं आहे. अर्थात असे कित्येक कुंभमेळे आले आणि गेले. संत तुकारामांच्या काळापासून एकविसाव्या शतकापर्यंत कुंभमेळ्यांवरच्या चर्चा, टीका-टिप्पण्या सुरू राहिल्या, पण कुंभमेळा होतच राहिला.

संत गोरा कुंभारांच्या दारी

नास्तिकतेचे संस्कार स्वीकारलेला आणि देव, दैव, श्रद्धा याबाबत चिकित्सेची भूमिका असलेला सामाजिक संस्थेतील कार्यकर्ता संत गोरोबांच्या समाधीस्थळी पोहचतो, तेव्हा त्याला स्वत:बद्दलच प्रश्न पडतात...

-प्रशांत खुंटे
अंकः जुन २००६

बचतगटाच्या महिलांचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी उस्मानाबादमध्ये होतो. तीन दिवसांचं प्रशिक्षण. पहिला दिवस पार पडलाय. मानवी हक्क, संवैधानिक हक्क असं काय काय मी त्या ग्रामीण महिलांसमोर बडबडलोय. संविधान म्हणजे काय? या माझ्या प्रश्नावर बहुतेकींचे चेहरे सपाट झाले. एका मुलीनं तेवढं ‘आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक’ असं उत्तर दिलंय. दोनेक तास माझी बडबड. शेवटी-शेवटी माझाच आवाज मला ऐकू येतोय. वाळलेला. नकोसा. दुसरा दिवस मला विश्रांती. थोडं पर्यटन करावं म्हणून इथलं तेर या गावचं ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय पाहायचं ठरवून स्टँडवर पोहोचलो.

दिंडी चालली चालली

विठूनामाचा गजर करत आणि त्याच्या दर्शनाची निखळ आस मनामध्ये बाळगत साधी-सुधी लक्षावधी माणसं दरवर्षी नित्यनेमाने ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांबरोबर पंढरीची वाट चालत असतात. श्रद्धा आणि भक्तीच्या या वाटेवर ‘वारीची डॉक्टर’ बनून आपली सेवा अर्पित करताना लेखिकेला आलेली उत्कट अनुभूती!

-मीना प्रभु
अंकः दिवाळी २००६

ज्ञानदेव. श्री शारदेच्या गळ्यातला कंठमणी. त्यांचेच सहचर अधिकारी तुकाराम. दर आषाढात या दोघांच्या पालख्या पुण्यात यायच्या. तो एक दिवस एरव्हीचं व्यवहारी पुणं भक्तिरसात बुडून जायचं. ज्ञानेश्वर पादुका चौकात त्या थांबायच्या आणि त्या प्रचंड गर्दीत माझ्या माऊलीचा हात धरून मी माउलींच्या दर्शनाला जायची. त्यांचा प्रसाद म्हणून कपाळभर बुक्का लावून परतायची

तृण रानोमाळ पांगलेसे...

पालखी आली... गेली. सारेच विलक्षण ऊर्जेने भारावले. विवेकी मन मानायला तयार नव्हतं; पण इंद्रियानुभव आला हे नाकारणं अशक्यच. नेमकं काय, कसं? तृणांवरचे हे दवबिंदू पकडायचे कसे?

-निशिकांत भालेराव

आधीच स्पष्ट केलेलं बरं, की मी रॅडिकल, पुरोगामी, विवेकवादी असलो तरी सश्रद्ध आहे. देव, नियंता या केवळ संकल्पना आहेत, हे माझं ठाम मत असलं, तरी पंढरपूरचा विठोबा आणि त्याच्या भक्तांच्या मांदियाळीवर माझी श्रद्धा आहे.

Syndicate content