आजचे जग

आपलं मौन सांगतंय, ही क्रूरता आपल्याला मान्य आहे! - रवीश कुमार

गुजरातमध्ये दलित समाजातल्या चार व्यक्तींवर झालेल्या माजोर अत्याचाराच्या अन् त्याबद्दल समाजाने बाळगलेल्या सोईस्कर मौनाच्या विरोधातल्या या बोलक्या प्रतिक्रिया. एक, एनडीटीव्ही इंडियाचे पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेली ब्लॉगपोस्ट; तर दिल्लीस्थित कवी अशोककुमार पाण्डेय यांची गुजरातेतल्या बहाद्दूर दलित कार्यकर्त्यांना समर्पित केलेली कविता.

बुडता पंजाब - नितीन चौधरी

‘उड़ता पंजाब’ सिनेमा वादात अडकला आणि पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या समस्येऐवजी सेन्सॉर बोर्डावरच जास्त चर्चा झाली. प्रत्यक्षात पंजाब कोणत्या परिस्थितीत होरपळतो आहे याचं चित्र अजूनही आपल्यासमोर आलेलं नाही.
पंजाबात व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांशी चर्चा करून या समस्येच्या अंतरंगात डोकावण्याचा एक प्रयत्न.

सलोख्याचे प्रदेश - सबा नक्वी

भारतातलं विविध धर्मांचं सहजीवन कधी संशयाच्या तर कधी विद्वेषाच्या धुक्याने वेढलेलं दिसतं. पण राजकारणाने गढुळलेलं हे वरचं पाणी बाजूला केलं की दिसतं, देशाच्या कानाकोपर्‍यांत हिंदू-मुस्लिम-ख्रिश्‍चन आपापल्या धर्मांसह एकमेकांमध्ये मिसळून गेलेले दिसतात. त्यांच्या देवाणघेवाणीतून अनेक संयुक्त धार्मिक परंपरा तयार झाल्या आहेत.
आजवर अज्ञात राहिलेले हे सलोख्याचे प्रदेश शोधून काढले आहेत सबा नक्वी या सुप्रसिद्ध पत्रकर्तीने. त्यांनी लिहिलेल्या ‘इन गुड फेथ’ या पुस्तकाचा अनुवाद लवकरच समकालीन प्रकाशनातर्फे ‘सलोख्याचे प्रदेश’ या नावाने प्रकाशित होत आहे. त्यातलेच हे काही प्रदेश.

फ्री बेसिक्स म्हणजे रे काय, झुकरबर्ग?

फेसबुकमार्फत सुरू असलेल्या फ्री बेसिक्सच्या जाहिरातींवरून सध्या बराच वादंग सुरू आहे. नेट न्युट्रॅलिटी आणि फ्री बेसिक्स ही नेमकी काय भानगड आहे याचा ऊहापोह.

तमाशा, रणबीर कपूर आणि ज्याचे त्याचे कोर्सिका - राजेश्‍वरी देशपांडे

गेल्या पाच-दहा वर्षात भारतातलं समाजजीवन झपाट्याने बदलत आहे. त्याचे पडसाद इथल्या सांस्कृतिक व्यवहारांवरही पडत आहेत. एकात एक गुंतलेल्या अशा अनेक घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भारतातल्या बदलत जाणार्‍या सार्वजनिक चर्चाविश्‍वाचा धांडोळा घेण्याचा हा एक प्रयत्न.

सॅनिटरी नॅपकिन्स : उत्तराच्या पोटातले प्रश्न - गौरी कानेटकर

मासिक पाळीच्या काळात घरगुती कापड वापरणाऱ्या महिलांची संख्या भारतात मोठी आहे. पाळीच्या काळातल्या स्वच्छतेबद्दल पुरेशी जागरुकता नसल्याने या महिलांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत सॅनिटरी नॅपकिन्स पोहोचले तर हा प्रश्न सुटेल, असं आपल्याला वाटतं. पण खरंच सॅनिटरी नॅपकिन्स हे या प्रश्नावरचं उत्तर आहे का? की या उत्तरातही आणखी गंभीर प्रश्न दडलेले आहेत?

SANITARY NAPKINS.jpg
कचराकुंडीतून बाहेर ओसंडून वाहणारा कचरा... कपड्यांपासून ते प्लास्टिकच्या पिशवीला गाठ मारून टाकलेल्या खरकट्या अन्नापर्यंत सगळं काही.. अन्नाच्या शोधात कुत्री तो कचरा डिवचतायत.. कचरावेचकही त्यातच हात घालून बरं काही हाती लागतं का बघतायत
...आणि तिथेच वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स कागदाच्या गुंडाळीतून बाहेर येऊन बापुडवाणे उघडे पडले आहेत. त्यातल्या काळपट लाल कापसाचे तुकडे इतस्ततः विखुरले गेलेत...

वाटणी झालेल्या घरातून

पाकिस्तानबद्दल भारतीयांच्या मनात अगदी ठराविक कल्पना असतात. पण कुणाही सामान्य भारतीयाने पाकिस्तानात पाऊल ठेवलं, की आपल्या मनातील त्या मोनोलिथिक कल्पनांना तडा जातो.
अलीकडेच पत्रकार सारंग दर्शने पाकिस्तानला जाऊन आले. त्यांना पाकिस्तान कसा दिसला?

मुंबईतल्या पत्रकारांच्या टीमने कराचीत पाऊल टाकल्यापासून सर्वांच्या मनात एक ओढ होतीच. ती म्हणजे पाकिस्तानचे जनक महंमदअली जीना यांचं स्मारक बघण्याची. त्याला ‘मझर-ए-कैद’ असं म्हणतात. जीनांचा गौरव ‘कैद-ए-आझम’ असा होतो. म्हणजे असामान्य, धुरंधर नेता. जीनांचं हे मझर कराचीच्या ऐन मध्यस्थानी आहे. त्याचा परिसर विशाल आहे. इथेच लालकृष्ण अडवाणी यांनी जीना यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. जीनांच्या या स्मारकाची देखभाल करण्याची सगळी जबाबदारी अफाफ एंटरप्रायजेस या खासगी कंपनीकडे ठेक्याने दिली आहे. आणि या कंपनीकडून नेमला गेलेला व्यवस्थापक आहे एक माजी लष्करी अधिकारी. त्यांचं नाव मेजर (निवृत्त) एस. अथर मीर.

'खेड्यांचा भारत' हद्दपारीच्या टप्प्यात

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपला देश, आपली माणसं, आजचं वास्तव याविषयी मराठीतील एखाद्या महत्त्वाच्या लेखकाने आपले विचार मांडावेत, अशी अनुभवची भूमिका असते. यावर्षी आम्ही ज्येष्ठ लेखक राजन गवस यांना निमंत्रित केलं आहे. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. ग्रामीण वास्तवाचं यथार्थ चित्रण हे त्यांच्या साहित्यकृतींच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. आजच्या ग्रामीण वास्तवाविषयी त्यांनी केलेलं हे मुक्तचिंतन.

भारत हा खेड्यांचा देश आहे, असं कधी काळी लोक भाषणात, खासगी बोलण्यात, शिकवताना, लेखनात लिहायचे, म्हणायचे. हे वर्तमान ऐंशीचं दशक संपेपर्यंतच टिकलं. नंतर एकाएकी काय झालं कुणास ठाऊक, भारत आणि खेडं यांचा संबंध उच्चारातही उरला नाही. चुकून कोणी भारत हा खेड्यांचा देश आहे असं म्हटलं, एखाद्याने खेड्याविषयी लिहिलं तर त्याबाबत लगेच प्रतिक्रिया येते-आता खेडी उरलीयतंच कुठे? महाराष्ट्रातली सगळी खेडी निम शहरं झाली आहेत. शेती करतोच कोण?- अशा प्रतिक्रिया देणारे, प्रश्नड उपस्थित करणारे कोण आहेत, त्यांना नेमकं म्हणायचं काय असतं याचा नीट शोध घेताना या पाठीमागे असणारं राजकारण आपल्या लगेच ध्यानात येतं.

Syndicate content