बहुतांची स्थलांतरे रोखण्यासाठी - कौस्तुभ आमटे

पाण्याची टंचाई, नापिकी आणि रोजगाराचा अभाव यामुळे गांजलेले लोक दरवर्षी राज्याच्याग्रामीण भागातून, विशेषतः मराठवाड्यातून पुण्या-मुंबईकडेस्थलांतर करतात. शहरात ते तग धरून राहतात खरे, पण त्याला जगणं म्हणता येऊ शकतं का? ही परिस्थिती बदलायची असेल तर गावखेड्यांत काळाशी सुसंगत असे नवे रोजगार तयार व्हायला हवेत.

‘आनंदवन समाजभान अभियानाने’ त्यादृष्टीने एक मॉडेल उभं करण्याचं काम हाती घेतलं आहे.