gauri's blog

शोधाशोधीची दिवाळी!

‘युनिक फीचर्स’चं हे पंचविसावं वर्ष आहे. त्यानिमित्त ‘युनिक फीचर्स’ची गोष्ट सांगणारी ही लेखमाला आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ‘युनिक फीचर्स’ने दिवाळी अंकांमधून भरपूर लिखाण केलं आणि दिवाळी अंकांमध्ये तोवर वापरला न गेलेला शोधलेखांचा फॉर्म तिथे वापरला. त्याबद्दल..

SHODHA SHODHICHI DIWALI कुणालाही दिवाळीचे वेध केव्हा लागतात? साधारणपणे गणपती-दसरा वगैरे सण जवळ आले की! पण आमच्याकडे-युनिक फीचर्समध्ये- चक्क वर्षभर दिवाळीचा विचार घुमत असतो. हा विचार अर्थातच फटाके-कपडेलत्ते-गोडधोड याबद्दलचा नसतो! आमच्याकडे चालू असते चर्चा दिवाळी अंकात काय काय करायचं आणि दिवाळी अंकांसाठी काय लिहायचं याची.

बहुसंख्याकवादाचा उदय?

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या हाती सूत्रं जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागल्यावर त्यांच्या समर्थकांत आनंदाचं उधाण यायला सुरुवात झाली. परंतु, या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अल्पसंख्याकांची मनोवस्था कशी होती, या प्रश्नाचं उत्तर ‘कमालीची सैरभैर’ असंच मिळतं. किंबहुना यापूर्वीच्या कुठल्याच निवडणुकीत जाणवली नसेल इतकी सैरभैर.

वृत्तवाहिन्यांचा सुळसुळाट

भारतातील बर्याचशा वृत्तवाहिन्या फायद्यात नाहीत, ही खरी गोष्ट आहे. परंतु निवडणुकीच्या काळात वृत्तवाहिन्यांना करोडोंच्या जाहिराती मिळतात आणि राजकीय पक्षाचे त्यांच्याशी लागेबांधे असल्यास त्या पक्षांना प्रचारासाठी फायदा मिळतो हेसुद्धा खरं. परंतु, केवळ त्याकरिता निवडणुका जवळ आल्या असताना नव्या वृत्तवाहिन्यांचं पेव फुटेल यावर आपला विश्वास बसू शकतो? मात्र, गेल्या सहा महिन्यांत विविध राज्यांमध्ये ज्या मोठ्या संख्येने नव्या वृत्तवाहिन्या आल्या आहेत ते पाहता वस्तुस्थिती लक्षात येते.

जातीय-वर्गीय उन्मादाचा बळी

नितीन आगे. वय वर्षे 17. राहणार खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर, राज्य- सुधारकांचं मानलं जाणारं महाराष्ट्र राज्य. नितीन हा अकरावीत शिकणारा दलित मुलगा. 28 एप्रिल 2014 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नितीनला शाळेच्या आवारातून मुख्याध्यापक व शिक्षकांच्या देखत मारहाण करत नेलं गेलं... तीन-चार तास अमानुष छळ करून त्याची हत्या करण्यात आली. का? कारण एका उच्चवर्णीय मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. कुणी केली हत्या? मुलीचा 21 वर्षीय भाऊ, अन्य नातेवाईक व मित्रांनी.

काश्मीरचे विद्यार्थी ‘देशद्रोही’?

मीरतच्या स्वामी विवेकानंद विद्यापीठात शिकणार्या काश्मिरी विद्यार्थ्यांनी ‘एशिया कप’साठीचा भारत-पाकिस्तानमधील सामना पाकिस्तानने जिंकल्यावर आनंदाने टाळ्या वाजवल्या असा त्यांच्यावर आरोप झाला. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये भांडणंही झाली. मग विद्यापीठाने ‘शांतता राखण्याचं’ कारण देऊन ६७ काश्मिरी विद्यार्थ्यांची काश्मीरमध्ये बोळवण केली. पोलिसांनी तर त्या विद्यार्थ्यांवर टाळा वाजवून ‘देशद्रोही कृती’ केली म्हणून त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा (कलम १२४ अ.भा.द.वि.चा) गुन्हा नोंदवला.

केजरीवाल, मेधा पाटकर आणि मुंबई

विधानसभा निवडणुकीत दिल्लीने ‘केजरीवाल किमया’ अनुभवली होती. या पार्श्वभूमीवर, जेव्हा अरविंद केजरीवाल 12 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारफेरीसाठी प्रथमच मुंबईत आले तेव्हा विशेषकरून पत्रकारांमध्ये एका गोष्टीबाबत विशेष उत्सुकता होती- केजरीवाल मुंबईवरही तसंच गारुड करू शकतील? त्यांच्या आगमनापूर्वी आणखी एका गोष्टीबाबतही विशेष कुतूहल दिसून येत होतं, ते म्हणजे मेधा पाटकरांसारख्या जनआंदोलनातून ‘आप’मध्ये आलेल्या उमेदवारांसोबत केजरीवालांचे सूर जुळतील का?

क्रिमियामुक्ती : बाजारशक्तीची ‘किमया’

16 मार्च 2014 रोजी युक्रेनमधील रशियनबहुल क्रिमिया प्रांतात सार्वमत घेतलं गेलं आणि तेथील 97 टक्के जनतेने आपल्याला युक्रेनपासून विभक्त होऊन रशियामध्ये विलीन व्हायचं आहे, असा कौल दिला. नोव्हेंबर 2013 पासून युक्रेन म्हणजे हिंसक वा आभासी उठावांचा, सैन्य कारवाईचा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय डावपेचांचा आणि नाट्यमय खेळींचा आखाडा झाला होता. एका बाजूला वर्चस्ववादी अमेरिका व ‘नाटो’ राष्ट्रं, तर दुसर्या बाजूला पोलादी रशियाचे सर्वेसर्वा अध्यक्ष पुतीन व रशियाची बलदंड ‘गॅझप्रोम’ कंपनी अशा दोन शक्तींमधील संघर्ष युक्रेनमध्ये केंद्रित झाला होता.

दहशतवाद्यांच्या ‘फाशी’चंही राजकारण!

तेवीस वर्षांपूर्वी राजीव गांधींची हत्या झाली होती. या दहशतवादी कृत्यात सामील असलेल्या सव्वीसजणांवर खटले झाले. त्यावर अपिलं झाली. त्यातील काहींना मृत्युदंडाची शिक्षाही ठोठावली गेली. त्यावर दयायाचनेचे अर्ज झाले होते, व ते दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने आता १८ फेब्रुवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यातील तीनजणांची मृत्युदंडाची शिक्षा कमी करून ती आजीवन कारावासात रूपांतरित केली. प्रकरण इथे संपेल असं कुणालाही वाटलं असतं; पण नाही. ‘एआयडीएमके’च्या जयललिता, दिवंगत राजीव गांधींचे सुपुत्र राहुल गांधी, कॉंग्रेस, ‘डीएमके’ या सर्वांनाच इतक्या गंभीर प्रकरणाचंही प्रच्छन्न राजकारण करावंसं वाटलं!

‘पाथरीबल’चा निकाल, लष्कराला काळिमा

२००० सालामध्ये काश्मीरमधील पाथरीबल गावातील पाच नागरिकांची हत्या झाली होती. हे हत्याकांड लष्कराने ‘खोट्या चकमकी’द्वारे केल्याचा आरोप होता. त्यावर बराच वादंग झाला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर २०१२ मध्ये, म्हणजे घटनेनंतर सुमारे बारा वर्षांनी या प्रकरणाशी संबंधित लष्करी अधिकार्यां ची ‘कोर्ट मार्शल’द्वारे चौकशी करण्याचं लष्कारानी मान्य केलं होतं. परंंतु, या वर्षीच्या जानेवारीअखेरीस अचानक ‘पुराव्याअभावी’ कोर्ट मार्शल चौकशी निकाली काढल्याचं लष्कराने जाहीर केलं आणि काश्मीरमध्येच नाही, तर भारतात अन्यत्रही गदारोळ उडाला.

अरुणाचलचा ‘निडो’ : पूर्वग्रहांचा बळी

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण दिल्लीत वरपांगी फुटकळ वाटणारी मारामारीची घटना घडली. परंतु, या घटनेत मारहाण झालेल्या निडो तानिया या केवळ एकोणिस वर्षांच्या अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्याचा दुसर्या् दिवशी मृत्यू ओढवला. त्यानंतर ईशान्य भारतीय युवक-युवती मोठ्या संख्येने रस्त्यावर आले आणि निडो हा भारतीयांच्या मनातील ईशान्य भारतीयांबाबतच्या पूर्वग्रहाचा बळी ठरल्याचं उघड झालं. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीत पूर्वग्रहाची ही समस्या किती तीव्र आहे तेही या निमित्ताने समोर आलं.

Syndicate content