developer's blog

माग आमच्या शोधाशोधीचा!

अनुभव मासिकाची मातृसंस्था असलेल्या ‘युनिक फीचर्स’चं हे पंचविसावं वर्ष आहे. त्यानिमित्त ‘युनिक फीचर्स’ची गोष्ट सांगणारी ही लेखमाला आम्ही प्रसिद्ध करत आहोत.
या लेखात वाचा ‘युनिक फीचर्स’चे ब्रँड अँबॅसडर असणाऱ्या शोधलेखांचा प्रवास.

Unique lekh photo.jpg

धडपड्या मुलांची सुरुवातीची गोष्ट

‘अनुभव’ मासिकाची मातृसंस्था असलेल्या ‘युनिक फीचर्स’चं हे पंचविसावं वर्ष. त्या निमित्ताने ‘युनिक फीचर्स’ची गोष्ट सांगणारी ही लेखमाला आम्ही प्रसिद्ध करत आहोत.
‘युनिक फीचर्स’ हे नाव ज्यावरून ठेवलं गेलं त्या फीचर्स सिंडिकेशनच्या इनोव्हेशनची कहाणी सांगणारा हा लेख.

२००० साली ‘युनिक फीचर्स’ने दहा वर्षांचा टप्पा पार केला तेव्हा एक छोटीशी पुस्तिका प्रकाशित केली होती. त्या पुस्तिकेच्या पहिल्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं : ‘फीचर्स सर्व्हिस’. ‘फीचर्स सर्व्हिस’ म्हणजे काय हा प्रश्न आम्हाला दहा वर्षांपूर्वी अनेक वेळा विचारला गेला... पण आता ‘युनिक फीचर्स’ म्हणजे काय हे सांगावं लागत नाही’...
या वाक्याचा एक साधा अर्थ असा, की ‘फीचर्स सर्व्हिस’ नावाची चीज जी मराठी लेखन व्यवहारात नव्हती ती युनिक फीचर्सने रुजवलीच, शिवाय काम करता करता स्वत:ची अशी ओळखही तयार केली!

गद्धेपंचविशी

‘युनिक फीचर्स’चं हे पंचविसावं वर्ष आहे. त्यानिमित्त ‘युनिक फीचर्स’ची गोष्ट सांगणारी ही लेखमाला आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

‘काय, युनिक फीचर्स सुरू होऊन पंचवीस वर्षं झाली?’
हा प्रश्न आम्हाला हल्ली पुन्हा पुन्हा विचारला जातोय. कुणी हा प्रश्न खेकसत प्रेमाने विचारतो तर कुणी साशंक अचंब्याने. प्रश्न विचारणाऱ्याचा ‘युनिक फीचर्स’शी किती काळ आणि किती घनिष्ठ संबंध आहे यावर प्रश्नांकित स्वराची प्रतवारी ठरते.

पद्म पुरस्कार

महिन्याभरात घडणाऱ्या सर्वच घडामोडींचं प्रतिबिंब ‘अनुभव’च्या अंकात पडतं असं नाही. कधी एखाद्या विषयावर माध्यमांमध्ये बरीच चर्चा होऊन जाते, तर कधी वाचकांना पुढे नेऊ शकणारी माहिती-अर्ग्युमेंट सापडण्यास वेळ लागतो. कधी ते लिहू शकणारा सुयोग्य लेखक हाती लागत नाही. या महिन्यातले असे विषय कोणते?

या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं? वाचकांचंही त्या त्या विषयाबद्दल काही मत असणार. ते आम्हाला जरूर कळवा. त्यातल्या निवडक मतांना आम्ही अंकात जरूर जागा देऊ. आपल्या प्रतिक्रिया नेमका मुद्दा मांडणाऱ्या असाव्यात, एवढीच अपेक्षा. –संपादक

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारत सरकारतर्फे ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुरस्कार ज्यांना दिले जातात त्यातील अनेक नावांबद्दल वाद होत असतात. देश ज्यांना सन्मानित करतो त्यांच्याबद्दल तरी वाद होऊ नयेत, अशी कुणाचीही भावना असणार. नवं सरकार याबाबत काही ‘अच्छे दिन’ आणेल अशी आशा अनेकांना होती; परंतु याही सरकारच्या बाबत ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती दिसते.

घर वापसी

महिन्याभरात घडणाऱ्या सर्वच घडामोडींचं प्रतिबिंब ‘अनुभव’च्या अंकात पडतं असं नाही. कधी एखाद्या विषयावर माध्यमांमध्ये बरीच चर्चा होऊन जाते, तर कधी वाचकांना पुढे नेऊ शकणारी माहिती, आर्ग्युमेंट सापडण्यात वेळ लागतो. कधी ते लिहू शकणारा सुयोग्य लेखक हाती लागत नाही. या महिन्यातले असे विषय कोणते? या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं?
वाचकांचंही त्या त्या विषयाबद्दल काही मत असेल ते आम्हाला कळवा. त्यातील निवडक मतांना आम्ही अंकात जरूर जागा देऊ. - संपादक

घर वापसी

हिंदू धर्मातून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात गेलेल्या व्यक्तींना पुन्हा हिंदू धर्मात परत घेण्याची मोहीम सध्या देशात जोरात सुरू आहे. या ‘घर वापसी’च्या निमित्ताने काही मुद्दे उपस्थित होत आहेत.
* हिंदू धर्म सोडून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्यांमध्ये दलितांचं प्रमाण सर्वाधिक आहे. हिंदू धर्मात माणुसकीची वागणूक न मिळाल्याने ज्यांनी धर्म सोडला त्या पूर्वाश्रमीच्या अस्पृशांना घर वापसीनंतर हिंदू धर्मात माणुसकीचं आणि सन्मानाचं स्थान मिळेल याची खात्री कोण आणि कशी देणार?

Syndicate content