अनुभवविषयी

अनुभव हे युनिक फीचर्सचं मासिक.
दैनिकं आणि वृत्तवाहिन्या यांच्या धावत्या स्वरुपाच्या कामामधून ज्यांचं समाधान होत नाही, अशा वाचकांच्या विचारांना चालना देण्यासाठी एक व्यासपीठ असायला हवं, अशी भूमिका घेऊन गेल्या १० वर्षांपासून अनुभव प्रकाशित होतं. पाककला, भविष्य, मेंदी, पर्यटन, टीव्ही-सिनेमा, क्रिकेट या पलीकडच्या विषयांना गवसणी घालणं, हे अनुभवचं वैशिष्ट्य. आज भरमसाठ माध्यमांतून जी प्रचंड माहिती वाचकांवर ओतली जाते, त्यावर प्रक्रिया करून ती वाचकांसमोर आणणे आणि आपला भवताल समजून घेण्यास मदत करणे हे अनुभव आपलं काम मानतो. जगातल्या व्यवहारांकडे ज्यांना मोकळेपणाने पहायचं आहे आणि त्या व्यवहारात स्वतःची भूमिका शोधायची आहे, त्यांना त्यामुळेच अनुभव जवळचा वाटतो.

अनुभव हे पत्रकारांनी चालवलेलं मासिक आहे. त्यामुळे वास्तवाला थेट भिडून परिस्थिती समजून घेण्याची परंपरा या अंकातून तयार झाली आहे. आपल्या जगण्यातील असे अनेक विषय जे आपण दृष्टि आड केलेले असतात, ते वाचकांपुढे आणण्याचं काम अनुभवमार्फत केलं जातं. प्रश्न दृष्टिआड करून संपत नसतात, तर ते समजून घेतल्याने उत्तरांच्या दिशांचा अंदाज येत असतो, अशी अनुभवची भूमिका आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातीलही नामवंत, सजग, अभ्यासू लेखक, कवी, पत्रकार, अभ्यासक, संशोधक यांना अनुभवमधून लिहितं केलं जातं.

अनुभवची वार्षिक वर्गणी -
छापील अंक : 650 रु. (दिवाळी अंकासह)
PDF अंक : 300 रु. (दिवाळी अंकासह)
वर्गणीसाठी संपर्क : मंगेश - 9922433614, सागर - 9820525523
PDF अंकासाठी संपर्क : anubhav.pdf@gmail.com

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा