ताज्या घडामोडी

दहशतीच्या छायेतलं सोन चमन - मिलिंद चंपानेरकर

जम्मूहून श्रीनगरचा प्रवास जेमतेम पाऊण तासाचा, पण त्यापूर्वी जम्मू विमानतळावर ‘चेक-इन’ करायला दीड तास लागला. सोबत होती एक हँडबँग आणि एक छोटीशी खांद्यावरची बॅग. परंतु माझ्यासह या सामानाचं किमान तीन वेळा ‘स्क्रीनिंग’ झालं. एवढं कमी नव्हतं म्हणून की काय, सामान विमानात चढवण्यापूर्वी ‘लगेज सेक्शन’मध्ये बोलावण्यात आलं आणि आपापलं सामान ‘ओळखण्यास’ सांगितलं गेलं. अर्थात, ‘काळजीपूर्वक तपासा’चे हे सर्व सोपस्कार सर्वच प्रवाशांना पार पाडणं भाग होतं. यातून दोन गोष्टी सूचित होत होत्या.

आनंदवन प्रयोगवन

बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे.

शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.

आज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याहीपलीकडे गावाखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरणही आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाऱ्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे.

‘आप’के साइड इफेक्ट्स - सुहास कुलकर्णी


प्रत्येक निवडणुकीचा निकाल काही एक संदेश देत असतो. निवडणूक जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या पक्षांना हा संदेश समजून घ्यावा लागतो. जे पक्ष संदेशाच नेमकं वाचन करू शकतात, ते पुढे जातात. जे पक्ष डोळ्यावर कातडं ओढून घेत आहेत, त्यांना लोक झटके देत राहतात. याचा अर्थ, कोणत्याही लोकशाही देशामध्ये मतदारांची समूहशक्ती जो निर्णय घेत असते, त्यातून आगामी राजकारण आणि येणारा काळ आकार घेत असतो. दिल्लीच्या निवडणूक निकालातून असा कोणता संदेश दिला गेला आहे?

ई - संमेलन १५

समकालीनची आगामी पुस्तकं

१) प्रख्यात विज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी लिहिलेलं स्वतःचं वाचनचरित्र - लेखकांनी आत्मचरित्र लिहिणं हे आपल्यासाठी नवं नाही. पण निरंजन घाटे यांनी लिहिलंय ते त्यांनी आजवर वाचलेल्या असंख्य पुस्तकांबद्दल, त्यांच्या लेखकांबद्दल आणि ही पुस्तकं मिळवण्याच्या खटाटोपाबद्दल. मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग.