घुसळण कट्टा

अमृत बंग

अमृत बंग हा निर्माण या सामाजिक उपक्रमाचा समन्वयक. तरूण मुलामुलींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करून त्यांना कृतिशील बनवण्यासाठी हा वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी अमृत आणि सरकारी अमिताभ खरे यांच्याशी मारलेल्या गप्पा.

---------------------------------------------------------------

मयूरेश प्रभुणे

मयूरेश प्रभुणे हे महाराष्ट्र टाईम्स या दैनिकाचे विज्ञान विषयाचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करतात. पण हा फक्त त्यांच्या विज्ञान क्षेत्रातल्या कामाचा एक भाग आहे. खगोल विश्व ही त्यांची संस्था खगोलशास्त्राविषयी आपल्या समाजात जागरूकता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित करत असते. शिवाय 'सॅटेलाईट सायन्स' हे त्यांनी शालेय मुलांसाठी सुरू केलेलं विज्ञान विषयावरचं मासिक.