इच्छुक लेखकांसाठी

समकालीन प्रकाशनातर्फे आम्ही मराठी आणि इंग्रजीतील विविध समकालीन विषयांवरील दर्जेदार पुस्तके प्रकाशित करतो. या दोन्ही भाषांमध्ये पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांशी जोडून घेता यावं, असा आमचा प्रयत्न आहे. ज्या लेखकांना प्रकाशनाच्या विचारार्थ समकालीनकडे आपलं स्क्रिप्ट पाठवायचं असेल, त्यांच्यासाठी हे काही मुद्दे.
१) आपलं स्क्रिप्ट मेल अथवा इतर कोणत्याही डिजिटल फॉर्ममध्ये पाठवू नका. ते शक्यतो कोऱ्या पानांवर (पाठपोठ नको) टाइप करून घेतलेलं आणि वाचता येईल अशा फाँटमध्ये प्रिंट आऊट काढलेलं असावं.
२) संपूर्ण स्क्रिप्ट पाठवण्याआधी आपण लिहिलेल्या पुस्तकाबद्दल थोडक्यात टीपण आणि काही नमुना प्रकरणं पाठवलीत, तर अधिक चांगलं.
३) आपलं स्क्रिप्ट प्रकाशनासाठी स्वीकारणं शक्य आहे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला कमीत कमी तीन महिने लागतील. तीन महिन्यानंतरही आपल्याला आमच्याकडून निर्णय न मिळाल्यास आपण samakaleen@gmail.com येथे संपर्क करू शकता.
४) संपादक मंडळातील सर्व सहका-यांचं मत आजमावून आणि त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ घेऊनच आपल्याला प्रकाशनासंदर्भात निर्णय दिला जाईल. त्यामुळे आपलं स्क्रिप्ट स्वीकारणं आम्हाला शक्य नसल्यास त्याबद्दल आम्ही पूर्ण विचार केला आहे, यावर विश्वास ठेवा. या नकारामागचं कारण आम्हाला देता येईलच, असं नाही.
५) आपल्या पुस्तकाचा प्रस्ताव विचाराधीन असेल, तर आपलं संपूर्ण स्क्रिप्ट वाचण्यासाठी मागवण्यात येईल. पण त्याचा अर्थ प्रकाशनासाठी होकार, असा नव्हे. अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्हाला संपूर्ण स्क्रिप्ट वाचणं गरजेचं वाटतं आहे, एवढाच त्याचा अर्थ.
६) आमच्याकडे आपल्या मूळ स्क्रिप्टची फोटोकॉपीच पाठवा. मूळ किंवा एक प्रत तुमच्याकडे असू द्या. हे पुस्तक आमच्यातर्फे प्रकाशित न करण्याचा निर्णय झाल्यास आमच्याकडची प्रत तुम्हाला परत दिली जाणार नाही. किंवा निर्णय होण्याच्या काळातही आमच्याकडून प्रत गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, याची नोंद घ्या.
७) पुस्तकाची संकल्पना आपल्या डोक्यात असेल आणि ते पुस्तक समकालीनतर्फे प्रकाशित व्हावं, अशी इच्छा असेल, तर ती संकल्पना नेमकेपणाने मांडणारे टिपण आणि संभाव्य पाने इ.ची माहिती आमच्याकडे पाठवलीत, तरी त्या अनुषंगानेही पुढे चर्चा होऊ शकते. पण त्यासाठी आधी संकल्पनेचं टिपण लेखी पाठवणं गरजेचं आहे.